कर्नाटकात काँग्रेस-जनता दल आघाडीचाच वरचष्मा; मिरवणुकीत उमेदवारावर अॅसिड फेकण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 05:39 AM2018-09-04T05:39:36+5:302018-09-04T05:39:57+5:30

कर्नाटकात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून, भाजपा दुसऱ्या स्थानी आहे. काँग्रेसने ९८१ जागी विजय मिळविला, तर भाजपाचे उमेदवार ९२९ ठिकाणी निवडून आले.

In Karnataka, the Congress-Janata Dal leads the front; An attempt to throw acid on a candidate in the procession | कर्नाटकात काँग्रेस-जनता दल आघाडीचाच वरचष्मा; मिरवणुकीत उमेदवारावर अॅसिड फेकण्याचा प्रयत्न

कर्नाटकात काँग्रेस-जनता दल आघाडीचाच वरचष्मा; मिरवणुकीत उमेदवारावर अॅसिड फेकण्याचा प्रयत्न

Next

बंगळुरू : कर्नाटकात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून, भाजपा दुसऱ्या स्थानी आहे. काँग्रेसने ९८१ जागी विजय मिळविला, तर भाजपाचे उमेदवार ९२९ ठिकाणी निवडून आले. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या जनता दल (ध) ला ३७५ जागा मिळाल्या असून, अपक्ष व अन्य उमेदवार ३२९ ठिकाणी निवडून आले आहेत.
या निवडणुकांद्वारे सत्ताधारी काँग्रेस-जनता दल यांच्यावर कुरघोडी करण्याचा भाजपाचा प्रयत्न होता, पण तो यशस्वी झाला नाही. या निवडणुकांसाठी ईव्हीएमचा वापर करण्यात आला होता. तुमकुरमध्ये काँग्रेसच्या एका उमेदवाराने विजयी मिरवणूक काढली असता, त्याच्यावर अ‍ॅसिड फेकण्यात आले. (वृत्तसंस्था)

Web Title: In Karnataka, the Congress-Janata Dal leads the front; An attempt to throw acid on a candidate in the procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.