रोड शो दरम्यान काँग्रेस नेत्याने लोकांवर उधळले पैसे, व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 10:40 AM2023-03-29T10:40:04+5:302023-03-29T10:41:44+5:30
या व्हिडिओमध्ये काँग्रेसचे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार (DK Shivkumar) रोड शो करतेवेळी लोकांवर 500-500 रुपयांच्या नोटा उडवताना दिसत आहेत.
बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. आज निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोग (Election Commission) आज सकाळी 11.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. दरम्यान, या तारखा जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेस नेत्याच्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये काँग्रेसचे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार (DK Shivkumar) रोड शो करतेवेळी लोकांवर 500-500 रुपयांच्या नोटा उडवताना दिसत आहेत. मंड्या जिल्ह्यातील बेनिवहल्ली येथे रोड शो करत असतानाचा डीके शिवकुमार यांचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने श्रीरंगणपट्टणमध्ये 'प्रजा ध्वनी यात्रा' आयोजित केली होती. यावेळी बेनिवहल्ली येथे रोड शोदरम्यान डीके शिवकुमार काही लोकांवर नोटा फेकताना दिसले. दरम्यान, यावेळी लोकांच्या शेजारी ढोल-ताशे वाजवणाऱ्या कलाकारांना डीके शिवकुमार हे बक्षीस म्हणून पैसे देत होते, असे म्हटले जात आहे.
#WATCH | Karnataka Congress Chief DK Shivakumar was seen throwing Rs 500 currency notes on the artists near Bevinahalli in Mandya district during the ‘Praja Dhwani Yatra’ organized by Congress in Srirangapatna. (28.03) pic.twitter.com/aF2Lf0pksi
— ANI (@ANI) March 29, 2023
याआधीही डीके शिवकुमार यांनी वादग्रस्त विधाने केली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्याचे डीजीपी प्रवीण सूद यांना नालायक म्हटले होते. प्रवीण सूद हे राज्यातील भाजप सरकारचा बचाव करत असून काँग्रेसच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करत असल्याचा दावा डीके शिवकुमार यांनी केला होता. तसेच, काँग्रेसची सत्ता आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा डीके शिवकुमार यांनी दिला होता.