गळा दाबून जमिनीत पुरलं, तरीही जिवंत आली बाहेर; योग शिक्षिकेने मृत्यूला दिली हुलकावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 05:45 PM2024-11-09T17:45:52+5:302024-11-09T17:47:18+5:30

कर्नाटकमध्ये महिला योग शिक्षिकेने हल्लेखोराला हुलकावणी देऊन आपला जीव वाचवला आहे.

Karnataka Crime News Yoga teacher was buried but still came out alive | गळा दाबून जमिनीत पुरलं, तरीही जिवंत आली बाहेर; योग शिक्षिकेने मृत्यूला दिली हुलकावणी

गळा दाबून जमिनीत पुरलं, तरीही जिवंत आली बाहेर; योग शिक्षिकेने मृत्यूला दिली हुलकावणी

Karnataka Yoga Teacher:  कौशल्य कोणतेही असो, ते शिकले तर वाया जात नाही. कारण कुठेतरी, कधी ना कधी त्याचा उपयोग होतोच. त्यामुळे स्वतःचा किंवा इतर कोणाचा तरी जीव नक्कीच वाचू शकतो. कर्नाटकातील चिकबल्लापूरमधूनही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चिकबल्लापूरमध्ये महिला योग शिक्षिकेचे अपहरण करून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र महिला योग शिक्षिकेने हल्लेखोराला हुलकावणी देऊन आपला जीव वाचवला आहे.

कर्नाटकातील एका ३४ वर्षीय योग शिक्षिकेचे काही गुडांनी अपहरण केले आणि अखेर तिचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. महिला शिक्षिकेने आपले कौशल्य वापरून मृत झाल्याचे नाटक केले. श्वास रोखून धरण्याच्या क्रियेवर तिचे प्रभुत्व असल्यामुळे ती महिला जीव वाचवू शकली. महिलेची तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी महिलेची वैद्यकीय तपासणी केली. याप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

महिला योग शिक्षिकेला विवस्त्र करून मारहाण करून तिचा गळा दाबून खून केल्याची घटना चिकबल्लापूर येथे उघडकीस आली आहे. मात्र, योग शिक्षिका असल्याने महिलेने हल्लेखोरांना चकवलं आणि जीव वाचवला. हे प्रकरण प्रेमप्रकरणातून घडलं असल्याची माहिती पुढे आली आहे. २३ ऑक्टोबर रोजी चिकबल्लापूरपासून ३० किमी अंतरावर निर्जनस्थळी हा सगळा धक्कादायक प्रकार घडला होता. गाडलेल्या खड्ड्यातून बाहेर येत ३४ वर्षीय योग शिक्षकाने गावकऱ्यांकडे मदत मागितली. गावकऱ्यांकडून कपडे मागितल्यानंतर महिलेने थेट पोलीस ठाणे गाठले.

बिंदू नावाच्या महिलेला तिच्या पतीचे योग शिक्षिकेशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. महिलेने तिचा मित्र सतीश रेड्डी याला योग शिक्षिकेवर लक्ष ठेवण्यास सांगितले. रेड्डी हा बंगळुरूचा रहिवासी आहे. तो एक खाजगी गुप्तहेर देखील आहे. रेड्डीने ३ महिन्यांपूर्वी योग शिक्षिकेकडून योगाचे वर्ग घेण्यास सुरुवात केली आणि या बहाण्याने त्याने योग शिक्षिकेचा विश्वास जिंकला. २३ ऑक्टोबर रोजी तो योग शिक्षिकेला घेऊन शहरात फिरायला गेला.

योग शिक्षिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरात फिरत असताना रेड्डी तिला शहराबाहेर एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला. यानंतर त्याने योग शिक्षकाचे कपडे काढून तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण केल्यानंतर रेड्डीने योग शिक्षिकेचा केबलने गळा आवळून खून केला. योग शिक्षिकेने आधी बेशुद्ध पडल्याचे नाटक केले. त्यानंतर तिने श्वासोच्छवासाचे विशेष तंत्र वापरून मृत्यू झाल्याचे नाटक केले. रेड्डी तिचा मृत्यू झाल्याचे समजून तिला खड्ड्यात पुरले. यानंतर रेड्डी याने आपल्या मित्रांच्या मदतीने योग शिक्षकाचे दागिने लुटले, माती टाकली आणि घटनास्थळावरून पळ काढला.

गावकऱ्यांच्या मदतीने योग शिक्षिकेने खड्ड्यातून बाहेर आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांनी गावकऱ्यांकडून कपडे मागितले आणि नंतर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या प्रकरणी बिंदू, सतीश रेड्डी यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. पीडित योग शिक्षिकेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अपहरण, खुनाचा प्रयत्न आणि इतर कलमांखाली आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: Karnataka Crime News Yoga teacher was buried but still came out alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.