कर्नाटक राज्य नक्षलमुक्त घोषित; शेवटच्या दोन नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 10:10 IST2025-02-04T10:10:11+5:302025-02-04T10:10:20+5:30
कर्नाटकात नक्षलवाद हा प्रामुख्याने २००० सालात बळावला. हिंसक घटना या काळात वाढीला लागल्या होत्या.

कर्नाटक राज्य नक्षलमुक्त घोषित; शेवटच्या दोन नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण
कर्नाटक राज्याला नक्षलमुक्त घोषित करण्यात आले आहे. शेवटच्या राहिल्यालेल्या दोन नक्षलवाद्यांनीही आत्मसमर्पण केल्याने कर्नाटकमध्ये आता कोणीही नक्षलवादी राहिला नाही. यामुळे सिद्धरामय्या सरकारने हा दावा केला आहे.
श्रींगेरीच्या किगा गावातील नक्षलवादी कोथेहुंडा रविंद्र (44)आणि दुसरा कुंडापुराचा रहिवासी असलेला थोंबुटु लक्ष्मी उर्फ लक्ष्मी पूजार्थी (41) यांनी चिकमंगळूर आणि उडुपी जिल्ह्यात आत्मसमर्पण केले आहे.
कर्नाटकात नक्षलवाद हा प्रामुख्याने २००० सालात बळावला. हिंसक घटना या काळात वाढीला लागल्या होत्या. नक्षलवाद संपवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू झाले आणि २०१० मध्ये त्याच्यावर पूर्णपणे नियंत्रण आले होते. मालनाड प्रदेशातील काही तुरळक घटना वगळल्या तर कर्नाटकात नक्षलवाद्यांच्या प्रभाव पुरता ओसरला होता.
सरकारच्या प्रयत्नांमुळे नक्षलवादी सरेंडर करू लागले होते. २०१६ मध्ये यामुळे १९ नक्षलवादी शेजारच्या केरळ राज्यात पळाले. यानंतर अनेकांनी कर्नाटकात परतण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चकमकीत ते मारले गेले. २०२३ मध्ये पश्चिमी झोनल घाट समितीच्या प्रमुखाला हैदराबादमधून अटक करण्यात आली, यानंतर दोन महिन्यांतच आंध्र प्रदेशातील नक्षली कविता उर्फ लक्ष्मीचे एन्काऊंटर करण्यात आले.
२०२४ च्या अखेरीस कर्नाटक पोलिसांच्या हाती नक्षलचे नेटवर्क वाढविणारा लागला. विक्रम गौडा परतल्याची माहिती मिळाली होती, त्याच्यासाठी जाळे टाकण्यात आले आणि त्याचा एन्काऊंटर करण्यात आला. अशा प्रकारे एकेक नक्षलवाद्याला संपविण्यात आले किंवा त्याला सरेंडर करण्यास भाग पाडण्यात आले. आज एकही कर्नाटकचा व्यक्ती नक्षलवादी नाही, असे सरकारने जाहीर केले आहे.