कर्नाटक काँग्रसचे ? पाच एक्झिट पोलनुसार एकहाती सत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 04:49 AM2023-05-11T04:49:26+5:302023-05-11T04:50:06+5:30
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानोत्तर जनमत चाचणीमध्ये काँग्रेस पक्षाला सत्तेत येण्याची नामी संधी असल्याचा अंदाज वर्तविला आहे.
सुनील चावके
नवी दिल्ली :कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानोत्तर जनमत चाचणीमध्ये काँग्रेस पक्षाला सत्तेत येण्याची नामी संधी असल्याचा अंदाज वर्तविला आहे. चार एक्झिट पोलमध्ये काँग्रेस २२४ बहुमतासाठी आवश्यक ११३ जागांचा आकडा गाठण्याची शक्यता वर्तविण्यात आली, तर चार एक्झिट पोलमध्ये काँग्रेस १०५पेक्षा जास्त जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष ठरेल असा अंदाज वर्तविला आहे.
झी न्यूज-मॅटराईज, न्यूज नेशन- सीजीएस, टाईम्स नाऊ- टीजी यांच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. एबीपी
न्यूज-सी व्होटर, टीव्ही ९ भारतवर्ष- पोलस्ट्रॅट, रिपब्लिक-पी मार्क व इंडिया टीव्ही - सीएनएक्स यांच्या एक्झिट पोलमध्ये त्रिशंकू विधानसभेत काँग्रेस संख्याबळात सर्वांत मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
७० टक्के मतदान
निवडणुकीसाठी बुधवारी ७० टक्के मतदान झाले. रामनगरमध्ये सर्वाधिक ७८.२२ टक्के, तर सर्वांत कमी बंगळुरू महापालिकेच्या दक्षिण भागात ४८.६३ टक्के मतदान झाले.
सत्ताधारी भाजप, काँग्रेस आणि जनता दल (एस) यांच्यात तिरंगी लढत होत आहे. २२४ सदस्य विधानसभेसाठी निवडून द्यायचे आहेत.
एकूण २,६१५ उमेदवार रिंगणात आहेत. २०१८ च्या निवडणुकीत ७२.३६% मतदान झाले होते.
चार राज्यांत पोटनिवडणुका
मतदारसंघ मतदान
जालंधर (लोकसभा) ५४%
स्वार (विधानसभा) ४४.९५%
छनबे (विधानसभा) ३९.५१%
झारसुगुडा (विधानसभा) ६८.१२%
सोहियोंग (विधानसभा) ९१.८७%