लिंगायतांना बाजूला केले, भाजपने राज्य गमावले; येदियुरप्पा, शेट्टर, सवदींचे खच्चीकरण पडले महागात

By श्रीनिवास नागे | Published: May 14, 2023 07:47 AM2023-05-14T07:47:45+5:302023-05-14T07:48:16+5:30

लिंगायतांची लोकसंख्या १७ टक्के असून, १४ जिल्ह्यांत त्यांचा प्रभाव आहे.

Karnataka election Lingayats sidelined, BJP loses state | लिंगायतांना बाजूला केले, भाजपने राज्य गमावले; येदियुरप्पा, शेट्टर, सवदींचे खच्चीकरण पडले महागात

लिंगायतांना बाजूला केले, भाजपने राज्य गमावले; येदियुरप्पा, शेट्टर, सवदींचे खच्चीकरण पडले महागात

googlenewsNext

बंगळुरु : माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा आणि जगदीश शेट्टर, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी या लिंगायत समाजाच्या ‘पॉवरफुल’ नेत्यांना बाजूला करणे भाजपला भोवले. स्वतंत्र लिंगायत धर्माला मान्यता देण्याचा प्रस्ताव फेटाळण्याच्या  भूमिकेचाही फटका बसल्याचे दिसते. 

लिंगायतांची लोकसंख्या १७ टक्के असून, १४ जिल्ह्यांत त्यांचा प्रभाव आहे. भाजपने येदियुरप्पा आणि शेट्टर यांना वयाचे कारण देत बाजूला केले होते. पण, येदियुरप्पा सोबत नसतील तर लिंगायत मते काँग्रेसकडे वळू शकतात, याची जाणीव झाल्याने भाजपने नंतर त्यांना काही जबाबदारी दिली. परंतु त्यांचे खच्चीकरण स्पष्ट दिसून आले. तिकीट नाकारल्याने शेट्टर व सवदी काँग्रेसमध्ये गेले. 

भाजपने मुस्लिमांचे चार टक्के ओबीसी आरक्षण रद्द करून लिंगायत व वक्कलिगांना विभागून दिले. पण, स्वतंत्र लिंगायत धर्माला मान्यता देण्याऐवजी भाजपने हिंदुत्वावर भर दिला. लिंगायतांऐवजी सगळे हिंदू एकत्र करून राजकारण करू, अशी जाहीर भूमिका घेतली. परिणामी, लिंगायत समाजाची नाराजी वाढली.

मुस्लिमांचे ध्रुवीकरण, काँग्रेसला फायदा
मुस्लीम समाजाचे चार टक्के ओबीसी आरक्षण रद्द करणे, सरकार पुन्हा आल्यास राज्यात कट्टर हिंदुत्वाचे ‘योगी मॉडेल’ राबविण्याची घोषणा यामुळे १३ टक्के लोकसंख्या असलेल्या मुस्लिमांत भाजपबद्दलचा रोष वाढत गेला. बजरंग दलावरील बंदीचा मुद्दा काँग्रेसने उचलून धरल्यानंतर भाजपने बजरंग दलाचे जोरदार समर्थन केले, त्यामुळे मुस्लीम मतांचे आपोआपच ध्रुवीकरण झाले. जनता दलाकडे जाणारी मुस्लीम मतेही काँग्रेसच्याच पारड्यात पडली.
 

Web Title: Karnataka election Lingayats sidelined, BJP loses state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.