Karnataka Election: ‘भगवान राम उत्तर प्रदेशचे तर हनुमान कर्नाटकचे’; निवडणूक प्रचारात CM योगींची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 02:58 PM2023-04-26T14:58:40+5:302023-04-26T15:02:00+5:30

सीएम योगी आदित्यनाथ कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत.

Karnataka Election: 'Lord Ram is from Uttar Pradesh and Hanuman is from Karnataka'; CM Yogi's entry in election campaign | Karnataka Election: ‘भगवान राम उत्तर प्रदेशचे तर हनुमान कर्नाटकचे’; निवडणूक प्रचारात CM योगींची एन्ट्री

Karnataka Election: ‘भगवान राम उत्तर प्रदेशचे तर हनुमान कर्नाटकचे’; निवडणूक प्रचारात CM योगींची एन्ट्री

googlenewsNext

Karnataka Election: कर्नाटक निवडणूक अगदी जवळ येऊन ठेवली आहे, त्यामुळे सर्वच पक्षांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे. भाजपनेही आपली सत्ता टिकवण्यासाठी प्रचार वाढवला आहे. यासाठी भाजपचे स्टार प्रचारक आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेदेखील अतिशय सक्रियपणे प्रचार करत आहेत. आज त्यांनी प्रचारादरम्यान उत्तर प्रदेश आणि कर्नाटकाचे नाते सांगितले. 

यावेळी बोलताना योगींनी उत्तर प्रदेश आणि कर्नाटकचे नाते रामायण काळापासून असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, 'भगवान श्री राम भगवान उत्तर प्रदेशचे आहेत आणि हनुमानजी कर्नाटकचे आहेत.' यावेळी त्यांनी युपीतील कायदा आणि सुव्यवस्थेवरही भाष्य केले. 'आज यूपीमध्ये कुठेच कर्फ्यू नाही, दंगल नाही. यूपीमध्ये सर्व काही सुरळीत सुरू आहे. आमच्या कार्यकाळात यूपीमध्ये एकही दंगल झालेली नाही. आमच्या डबल इंजिन सरकारने पीएफआयवर बंदी घातली, पण काँग्रेस पीएफआयला पाठिंबा देण्याचे काम करते.'

मुस्लिम आरक्षणावर सीएम योगी म्हणाले
मुख्यमंत्री योगी यांनी यावेळी मुस्लिम आरक्षणावरही भाष्य केले. 'कर्नाटकातील डबल इंजिन सरकारने मुस्लिम आरक्षण रद्द केले, ते गरीब आणि मागासांमध्ये विभागले. भारत धर्माच्या आधारावर आरक्षणाचा विचार करू शकत नाही. आम्ही पुन्हा भारताचे विभाजन करण्याचा विचार करू शकत नाही. आम्ही सुरक्षा आणि समृद्धीची हमी देऊ शकतो,' असेही ते म्हणाले.

भाजपसाठी कर्नाटकचा माग्र कठीण 
कर्नाटक निवडणुकीचा मार्ग भाजपसाठी अवघड दिसत आहे. प्रत्येक सर्वेक्षणात काँग्रेसचीच आघाडी पाहायला मिळत आहे. मात्र, भाजपने कर्नाटकात स्टार प्रचारकांची फौज उतरवली आहे. योगी आदित्यनाथ आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची लोकप्रियता खूप जास्त आहे. योगी आदित्यनाथ यांनी कर्नाटकातील कायदा आणि सुव्यवस्थेवर ठळकपणे भाष्य केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही जोरदार प्रचार केला आहे.

Web Title: Karnataka Election: 'Lord Ram is from Uttar Pradesh and Hanuman is from Karnataka'; CM Yogi's entry in election campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.