राजकीय लढाईमुळे पर्यटकांना डोकेदुखी, चेकिंग वाढली; हॉटेल्सही फुल्ल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 05:23 AM2023-05-09T05:23:09+5:302023-05-09T05:23:38+5:30

पर्यटनासाठी आलेलेे यामुळे वैतागले आहेत. 

karnataka election Political battles increase tourists' headaches, checking; Hotels are also full | राजकीय लढाईमुळे पर्यटकांना डोकेदुखी, चेकिंग वाढली; हॉटेल्सही फुल्ल

राजकीय लढाईमुळे पर्यटकांना डोकेदुखी, चेकिंग वाढली; हॉटेल्सही फुल्ल

googlenewsNext

विठ्ठल खेळगी

म्हैसूर : मुलांच्या शाळांना सुट्या लागल्याने बंगळुरू-म्हैसूर पर्यटनाचा प्लान आखत असाल तर दोन दिवस थांबा. कारण  कर्नाटकात प्रत्येक शहराच्या प्रवेशद्वारावर, रेल्वेस्थानक अन् बसस्थानकात तपासणीचे  चेकपोस्ट उभारले आहेत.  पर्यटनासाठी आलेलेे यामुळे वैतागले आहेत. 

सुट्यांमुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांतील पर्यटक बंगळुरू, म्हैसूर, उटी सफर करण्याचा प्लान करतात. त्यामुळे बंगळुरू व म्हैसूरमध्ये पर्यटकांची गर्दी वाढली आहे. 

हॉटेल्समधील रूमही फुल्ल

प्रचारासाठी येणारे कार्यकर्ते व प्रमुख नेते यामुळे म्हैसूरमधील प्रमुख हॉटेल्समधील रूम फुल्ल असल्याचे सांगण्यात आले. त्यात पर्यटकांची गर्दीही वाढली आहे. आणखी दोन दिवस हीच परिस्थिती राहील असे हॉटेल मॅनेजरकडून सांगण्यात आले.

उद्या मतदान

कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा सोमवारी थंडावल्या. बुधवारी, १० मे रोजी निवडणुकीसाठी मतदान होणार असून, निकाल १३ मे रोजी जाहीर होईल. या राज्याच्या विधानसभा निवडणुकांतील प्रचारात भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आदी दिग्गज नेते तर काँग्रेसकडून माजी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आदी सहभागी झाले होते. 

Web Title: karnataka election Political battles increase tourists' headaches, checking; Hotels are also full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.