Karnataka Election: प्रियंका गांधी रस्त्यावर नमाज अदा करत होत्या, मी स्वतः पाहिलंय- स्मृती इराणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 03:28 PM2023-05-05T15:28:39+5:302023-05-05T15:29:32+5:30

Karnataka Election: 'इस्लाम धर्म मानणारे कधीच मूर्ती पूजक होऊ शकत नाहीत, मंदिर बांधू शकत नाहीत.'

Karnataka Election: Priyanka Gandhi was offering Namaz on the street, I saw it myself - Smriti Irani | Karnataka Election: प्रियंका गांधी रस्त्यावर नमाज अदा करत होत्या, मी स्वतः पाहिलंय- स्मृती इराणी

Karnataka Election: प्रियंका गांधी रस्त्यावर नमाज अदा करत होत्या, मी स्वतः पाहिलंय- स्मृती इराणी

googlenewsNext


Karnataka Election: दक्षिणेकडील राज्य कर्नाटकमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. एकीकडे भाजप आपली सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करत आहे, तर काँग्रेस भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. यादरम्यान, दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर सौम्य ते अतिशय तीव्र टीकाही होत आहे. यातच आता भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्या एका वक्तव्याने नवीन चर्चेला तोंड फोडले आहे. 

बंगळुरुमध्ये टीव्ही-9 हिंदीशी बातचीतमध्ये स्मृती इराणी म्हणाल्या की, मी 2019 मध्ये काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांना म्हणाले होते की, ते मुख्यमंत्री होणार नाहीत, त्यामुळे त्यांनी मंदिराचे आश्वासन न दिलेलेच बरे. माझा त्यांना प्रश्न आहे की, असे वाक्य बोलण्यापूर्वी त्यांनी श्रीमती वाड्रा यांच्याशी काही चर्चा केली होती का? मी असे म्हणत आहे कारण, 2019 मध्ये मी श्रीमती वाड्रा यांना रस्त्यावर नमाज अदा करताना पाहिले आहे. इस्लाम धर्म मानणारे मूर्ती पूजक होऊ शकत नाहीत, मंदिर बांधू शकत नाहीत.'

कर्नाटकात भाजप सत्ते येणार
कर्नाटकात भाजप पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार असल्याचा विश्वास इराणी यांनी यावेळी बोलून दाखवला. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात समान नागरी संहिता टाकून प्रत्येक धर्माच्या आणि प्रत्येक वर्गातील महिलांना सक्षम बनवण्याची आपली वचनबद्धता बळकट केली आहे. प्रत्येक गरीब कुटुंबाला वर्षभरात 3 सिलिंडर मोफत देण्याची घोषणा, महिलांसाठी मोठ्या योजना, दुग्धव्यवसायात काम करणाऱ्या महिलांसाठी इन्सेंटिव्ह वाढवण्यासाठी आम्ही वनचबद्ध आहोत, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

इराणींचा काँग्रेसवर हल्लाबोल
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुढे म्हणाल्या की, आम्ही शहरी गरिबांसाठी 500000 घरे देण्याचे आश्वासन दिले आहे. पंतप्रधान घराची चावी फक्त महिलांच्या हातात देतात. काँग्रेस पक्षाला भगवान श्रीरामांची अडचण होती आणि रामभक्त बजरंगबली यांच्याशी त्यांची अडचण असल्याचे सर्वांनाच माहीत आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे की, जर कोणी मंचावरुन बजरंगबलीचे नाव घेतले तर काँग्रेसचे नेते त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार करतात रामभक्त आणि बजरंगबली भक्तांप्रती असा राग आणि द्वेष काँग्रेस पक्षाला शोभत नाही, असंही त्या म्हणाल्या.

Web Title: Karnataka Election: Priyanka Gandhi was offering Namaz on the street, I saw it myself - Smriti Irani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.