तरुण, वृद्धांच्या मतदानासाठी लागल्या रांगा; मतदान वाढवण्यासाठी आयोगाची आयडिया

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 08:33 AM2023-05-11T08:33:45+5:302023-05-11T08:34:27+5:30

मशीन बदलल्याच्या अफवेने निवडणूक अधिकाऱ्याला मारहाण, २२ अटकेत

karnataka election Queues of young, old to vote; Commission's idea to increase voter turnout | तरुण, वृद्धांच्या मतदानासाठी लागल्या रांगा; मतदान वाढवण्यासाठी आयोगाची आयडिया

तरुण, वृद्धांच्या मतदानासाठी लागल्या रांगा; मतदान वाढवण्यासाठी आयोगाची आयडिया

googlenewsNext

बंगळुरू / नवी दिल्ली : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी काही ठिकाणी झालेला गोंधळ वगळता शांततेत मतदान पार पडले. तरुण, वृद्धांच्या मतदानासाठी लागल्या रांगा लागल्या होत्या.

मतदानादरम्यान, विजयपुरा जिल्ह्यातील मसाबिनल गावातील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल) मशिन्स “बदलत” असल्याची अफवा गावात पसरल्यानंतर गावकऱ्यांनी अधिकाऱ्याला मारहाण केली. याप्रकरणी २३ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.

डॉ. कुरुलकर हे शेख, हुसेन, इब्राहिम असते तर...; उद्धव ठाकरेंची भाजपा, RSS वर टीका

तरुणांमध्ये उत्साह

मतदानाची प्रथमच संधी मिळालेल्या तरुणांनी आणि वृद्धांनी मोठ्या उत्साहाने मतदानासाठी मतदान केंद्रावर धाव घेतली. तरुण आणि वृद्ध मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले होते. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ११.७१ लाख मतदार आहेत जे पहिल्यांदाच मतदानासाठी पात्र ठरले आहेत. राज्यातील एकूण नोंदणीकृत मतदारांपैकी १६,९१४ मतदार हे १०० वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते, तर ८० वर्षांवरील मतदारांची संख्या १२.१६ लाख आहे.

निवडणूक म्हणजे सुट्टी नव्हे...

 प्रथमच मतदान करणाऱ्या तरुणांचा उत्साह मोठा होता. यावेळी बहुतेकांचे एकच उत्तर होते, मला मतदान करताना खूप आनंद झाला. हा माझा हक्क आहे. लोकशाही प्रक्रियेबाबत मतदारांची उदासीनता समजून घेत निवडणूक आयोगाने एका अनोख्या प्रयोगात मतदानाचा दिवस आठवड्याच्या मध्यावर निश्चित केला होता, ज्यामुळे लोक मतदानाच्या दिवसाची सुटी इतर सुट्यांमध्ये एकत्र करत बाहेर फिरायला जाऊ नयेत. निवडणूक आयोगाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बुधवारी मतदानाचा दिवस ठेवण्यात आला होता. सोमवारी मतदान असते तर शनिवार, रविवार सोबतच सोमवारीही सुटी घेतली असती.

कुणी केले मतदान?

 एका निवडणूक अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, कर्नाटक हे पहिले राज्य आहे जेथे विधानसभा निवडणुकीत ८० वर्षे पूर्ण झालेल्या आणि घराबाहेर पडू न शकलेल्या वृद्धांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा देण्यात आली होती.

 हसन जिल्ह्यातील होलेनरसीपूर तालुक्यातील मेलागोडू येथील रहिवासी असलेल्या १०० वर्षीय बोरम्मा यांनी मात्र मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याचा निर्णय घेतला. त्या मुलाचा हात धरून मतदान करण्यासाठी आल्या होत्या.

नागलक्ष्मी (वय ८४) यांनी मल्लेश्वरम, बंगळुरू येथे व्हीलचेअरने येत मतदान केले.

भाजपची ‘मनी पॉवर’...

सत्ताधारी भाजपला ‘मनी पॉवर’च्या माध्यमातून विधानसभा निवडणुका जिंकायच्या आहेत; कारण त्यांच्याकडे लोकांना दाखवण्यासाठी कोणतेही विकासकाम नाही. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारावर मौन बाळगले आहे.

-सिद्धरामय्या, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते

काँग्रेसला ‘तो’ अधिकार नाही...

भारतीय जनता पक्ष (भाजप) पूर्ण बहुमताने राज्यात पुन्हा सत्तेवर येईल. काँग्रेसला महागाईवरून केंद्रावर टीका करण्याचा अधिकार नाही, कारण काँग्रेसच्या काळात महागाई मोठ्या प्रमाणात होती. भाजप सरकार महागाई नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. यात यश येत आहे.

 - निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री

भाजप प्रचंड बहुमताने जिंकेल : बोम्मई

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राज्यात भाजप पूर्ण बहुमताने सत्तेत परतण्याचा विश्वास व्यक्त केला. हावेरी जिल्ह्यातील सरकारी शाळेत मतदान केल्यानंतर बोम्मई यांनी पत्रकारांना सांगितले की ते विक्रमी मताधिक्याने विजयी होतील. मुख्यमंत्रिपदी कायम राहण्याचा विश्वास आहे का? असे विचारले असता बोम्मई म्हणाले की, विधिमंडळ पक्ष आणि भाजपचे संसदीय मंडळ निवडणुकीनंतर या प्रश्नाचे उत्तर देईल.

Web Title: karnataka election Queues of young, old to vote; Commission's idea to increase voter turnout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.