Video - आनंदाश्रू! "खूप संघर्षानंतर विजय मिळाला"; सपा उमेदवार निकालानंतर ढसाढसा रडला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 04:04 PM2023-05-13T16:04:24+5:302023-05-13T16:11:35+5:30
Karnataka Election Result 2023 : अकील यांना त्यांच्या विजयाची बातमी कळताच सुरुवातीला त्यांचा विश्वासच बसला नाही. मात्र त्यानंतर ते मोठमोठ्याने रडायला लागले.
कानपूरमधील बेगमपुरवा प्रभागातून विजयी झालेले सपाचे उमेदवार अकील शानू यांना अश्रू अनावर झाले. अकील यांना त्यांच्या विजयाची बातमी कळताच सुरुवातीला त्यांचा विश्वासच बसला नाही. मात्र त्यानंतर ते मोठमोठ्याने रडायला लागले. अकील यांनी प्रभाग 102 मधून ही निवडणूक जिंकली. गेल्या 15 वर्षांपासून ते विजयासाठी संघर्ष करत होते, असे सांगितले जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
अकील शानू रडत रडत म्हणाले की, खूप संघर्षानंतर हा विजय मिळाला आहे. अकील शानू यांना बेगमपुरवा येथून सपाचे उमेदवार म्हणून उमेदवारी दिली होती. ते बऱ्याच वेळापासून जिंकण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र त्यांना यश मिळत नव्हते. मतमोजणीनंतर जेव्हा त्यांना विजयाचे चिन्ह देण्यात आले तेव्हा त्यांना सुरुवातीला विश्वास बसला नाही. नंतर ते ढसाढसा रडू लागले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला.
समाजवादी अकील शानू को तो भरोसा ही नहीं था में जीत जाऊंगा 🤣 pic.twitter.com/V6KVWAQW4h
— HELL WALA🌾🚜 (@hellwala) May 13, 2023
विजयानंतर अकील म्हणाले की, ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, त्यांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवली होती. यावेळी मी जिंकलो त्यामुळे माझा विश्वास बसेना आणि माझे अश्रू बाहेर आले. प्रदीर्घ कालावधीनंतर विजय मिळाल्याने अकील खूप आनंदी आणि समाधानी आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. निकालाच्या कलांनुसार, काँग्रेस 136, जेडीएस 20 तर भाजपा 64 जागांवर आघाडीवर आहे. तर इतर 7 जण आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.
"बजरंग बलीनेही कर्नाटकातील मोदींच्या प्रचाराला दाखवला ठेंगा"
ठाकरे गटाने देखील कर्नाटक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला डिवचलं आहे. "बजरंग बलीनेही कर्नाटकातील मोदींच्या प्रचाराला ठेंगा दाखवला" असं म्हणत खोचक टीका केली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "बजरंग बलीनेही कर्नाटकातील मोदीजींच्या प्रचाराला ठेंगा दाखवला. मीडिया जेपी नड्डाजी किंवा सीएम बोम्मईजी यांचा चेहरा पराभूत म्हणून दाखवू शकतो पण पंतप्रधान मोदींचे अपयश आहे कारण त्यांनी संपूर्ण प्रचार स्वतःबद्दल केला आहे" असं प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.