Karnataka Election Results : ...अन् काँग्रेसबद्दलची मोदींची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 10:58 AM2018-05-15T10:58:55+5:302018-05-15T14:53:20+5:30

आता कर्नाटकमध्ये भाजपाची घोडदौड वेगानं सुरू आहे आणि ते सत्तेच्या जवळ जाताना दिसताहेत. तसं झाल्यास, भाजपा २० राज्यांमध्ये भाजपाची सत्ता असेल.

Karnataka Election Result: now congress government remains only in 3 states | Karnataka Election Results : ...अन् काँग्रेसबद्दलची मोदींची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली

Karnataka Election Results : ...अन् काँग्रेसबद्दलची मोदींची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली

googlenewsNext

नवी दिल्लीः काही महिन्यांपूर्वी ईशान्य भारतातील त्रिपुरा आणि नागालँड या दोन राज्यांमध्ये 'कमळ' फुललं, तेव्हा देशातील १९ राज्यांमध्ये भाजपा सत्तेत होती. त्यानंतर, मेघालयमध्येही नॅशनल पीपल्स पार्टीसोबत त्यांनी सत्ता स्थापन केली आणि २०चा आकडा गाठला होता, पण तेलुगु देसम राओलातून बाहेर पडल्यानं आंध्र प्रदेशमधील सत्तेतून ते बाहेर गेले. आता कर्नाटकमध्ये त्यांची घोडदौड वेगानं सुरू आहे आणि ते सत्तेच्या जवळ जाताना दिसताहेत. तसं झाल्यास, एकेकाळी देशभरात सत्ता करणारा काँग्रेस फक्त तीन राज्यांमध्ये शिल्लक राहणार आहे. काँग्रेस आता फक्त 'पीपीपी' पक्ष ठरेल, असं मोदींनी कर्नाटकात प्रचार करताना म्हटलं होतं. पंजाब, पाँडेचरी आणि परिवार असा पीपीपीचा फुलफॉर्म मोदींनी सांगितला होता. मोदींची ही भविष्यवाणी आज खरी ठरताना दिसत आहे.

* भाजपकडील २० राज्यं

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, झारखंड, आसाम, हरियाणा, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, नागालँड, त्रिपुरा, मेघालय, कर्नाटक.

* काँग्रेसची सत्ता असलेली तीन राज्यं

पंजाब, मिझोरम, पाँडेचरी

* प्रादेशिक पक्षांचा 'आठवा'वा प्रताप

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, ओडिशा, तेलंगण, केरळ, दिल्ली, आंध्र प्रदेश, सिक्कीम

Web Title: Karnataka Election Result: now congress government remains only in 3 states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.