भाजपचं मन की बात आता 'धन की बात' झालं - काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2018 09:28 PM2018-05-16T21:28:47+5:302018-05-16T21:28:47+5:30

नवी दिल्लीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम आणि कपिल सिबल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपा सरकारवर टीका केली. 

Karnataka Election Results LIVE : The thing about BJP's mind is now 'talk of money' - Congress | भाजपचं मन की बात आता 'धन की बात' झालं - काँग्रेस

भाजपचं मन की बात आता 'धन की बात' झालं - काँग्रेस

Next

नवी दिल्ली - कर्नाटकातला सत्तासंघर्ष अधिक तीव्र झाला आहे.  भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपाल वजूभाई वाला यांनी आमंत्रण दिल्याचा दावा भाजपचे आमदार सुरेश कुमार यांनी केला आहे. त्यामुळे काँग्रेस-जेडीएसची सरकार स्थापन करण्याची स्वप्नं धुळीला मिळण्याची शक्यता आहे. याच धर्तीवर नवी दिल्लीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम आणि कपिल सिबल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपा सरकारवर टीका केली.  राज्यपालांच्या निर्णयामुळे कोर्टाचा अवमान झाल्याची भावना काँग्रेसने व्यक्त केली आहे. राज्यपालांवर सरकारचा दबाव असल्याचं स्पष्ट होत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला. मोदींची 'मन की बात' आता 'धन की बात' झाल्याची टीकाही काँग्रेसने केली.

 आम्ही राज्यपालांना पत्र देऊनही आमचं मत विचारात घेतलं गेलं नाही. संविधानाचं उल्लंघन होऊन न देण्याची जबाबदारी राज्यपालांची आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन होऊ न देणं राज्यपालांच्या हाती आहे' असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल म्हणाले.

जेडीएस आणि काँग्रेसने राज्यपालांची भेट घेऊन पूर्ण बहुमत मिळाल्याचा दावा केला होता. आम्ही विधीमंडळ सदस्यांच्या नावांची यादीही सुपूर्द केली होती. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची प्रतही आम्ही राज्यपालांना सोपवली होती. त्यामुळे ते संविधान आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला बांधील आहेत', असं काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

Web Title: Karnataka Election Results LIVE : The thing about BJP's mind is now 'talk of money' - Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.