Karnataka Elections 2018 :...तर वेगळा लागला असता कर्नाटक विधानसभेचा निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 12:20 PM2018-05-15T12:20:51+5:302018-05-15T12:46:46+5:30
दणदणीत विजयासह भाजपा कर्नाटकच्या सत्तेत पुनरागमन करणार, हे मतमोजणीच्या प्राथमिक कलांमधून स्पष्ट झाले आहे.
कोलकाता - दणदणीत विजयासह भाजपा कर्नाटकच्या सत्तेत पुनरागमन करणार, हे मतमोजणीच्या प्राथमिक कलांमधून स्पष्ट झाले आहे. भाजपाचा विजय निश्चित झाल्यानंतर आता राजकीय स्तरावरून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. कट्टर भाजपा विरोधी असलेल्या ममता बॅनर्जी यांनीही कर्नाटकच्या निकालांवर प्रतिक्रिया दिली असून, काँग्रेसने कर्नाटकमध्ये जनता दल (सेक्युलर) पक्षासोबत आघाडी केली असती तर निकालाचे चित्र वेगळे दिसले असते, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा कल स्पष्ट झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या," कर्नाटकमध्ये विजय मिळवणाऱ्या पक्षाचे अभिनंदन. ज्यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे, त्यांनी संघर्ष करून पुनरागमन करावे. जय या निवडणुकीत काँग्रेसने जनता दल (सेक्युलर) पक्षाशी आघाडी केली असती तर या निवडणुकीचा निकाल वेगळा लागला असत, खूपच वेगळा लागला असता."
Congratulations to the winners of the Karnataka elections. For those who lost, fight back. If Congress had gone into an alliance with the JD(S), the result would have been different. Very different
— Mamata Banerjee (@MamataOfficial) May 15, 2018