Karnataka Elections: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान शिव शंकरांप्रमाणे...'; ज्योतिरादित्य शिंदे यांचं काँग्रेसवर शरसंधान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 06:19 PM2023-05-03T18:19:38+5:302023-05-03T18:20:17+5:30

"आपणा सर्वांना सोबत घेऊन कर्नाटकचा विकास करण्याचा भाजपचा संकल्प आहे."

Karnataka Elections Prime Minister Narendra Modi like Lord Shiva Shankar Jyotiraditya Shinde's attack on Congress | Karnataka Elections: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान शिव शंकरांप्रमाणे...'; ज्योतिरादित्य शिंदे यांचं काँग्रेसवर शरसंधान

Karnataka Elections: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान शिव शंकरांप्रमाणे...'; ज्योतिरादित्य शिंदे यांचं काँग्रेसवर शरसंधान

googlenewsNext

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात करण्यात आलेल्या वक्तव्यावरून आणि बजरंग दलावर बंदी घालण्यासंदर्भात केल्या गेलेल्या भाष्यावरून काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान नीळकंठ यांच्या प्रमाणे, विरोधकांची एकेक शिवी पिऊन देशाचा विकास केला असल्याचे ज्योतिरादित्य यांनी म्हटले आहे. ते बुधवारी (3 मे) कर्नाटकातीलनिवडणूक प्रचारादरम्यान बोलत होते.

शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, हे मला साप म्हणतात, पण भगवान शिव शंकरांच्या गळ्यात नाग देवता विराजमान होते, हे यांनी विसरू नये. ज्या पद्धतीने भगवान शिव शंकरांनी विषपाण केले आणि एक नवा अध्याय सुरू केला. त्याच पद्धतीने पंतप्रदानांनी विरोधकांच्या शिव्या पिऊन देशाला विकासाच्या पथावर अग्रेसर केले आहे. 

आणखी काय म्हणाले ज्योतिरादित्य? -
काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर निशाणा साधताना ज्योतिरादित्य म्हणाले, ज्या देशद्रोही पीएफआयला काँग्रेस सरकारने नवी ऊर्जा दिली, त्या पीएफआयला तुरुंगात पाठवण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. आपणा सर्वांना सोबत घेऊन कर्नाटकचा विकास करण्याचा भाजपचा संकल्प आहे. तत्पूर्वी, काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात बजरंग दलाची तुलना पीएफआयसोबत करत, त्यावर बंदी घालू, असे म्हटले आहे.

खर्गे आणि त्यांच्या मुलाने नेकेले होते भाष्य - 
महत्वाचे म्हणजे, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नुकतेच कर्नाटकातील एका निवडणूक सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विषारी साप म्हणून संबोधित केले होते. यानंतर त्यांनी, आपण पंतप्रधानांना साप म्हटले नव्हे तर, ते ज्या भाजप आणि आरएसएसच्या विचारधारेचे नेतृत्व करतात, त्या संदर्भात वक्तव्य केले होते. यानंतर त्यांचा मुलगा आणि माजी मंत्री प्रियांक खर्गे यांनीही पंतप्रधान मोदींबद्दल अपशब्द वापरले होते.

 

Web Title: Karnataka Elections Prime Minister Narendra Modi like Lord Shiva Shankar Jyotiraditya Shinde's attack on Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.