Karnataka Floor Test: ज्योतिषांना विचारून कुमारस्वामींनी ठरवला शपथविधीचा मुहूर्त, बुधवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2018 06:45 PM2018-05-19T18:45:34+5:302018-05-19T23:27:53+5:30

कर्नाटक विधानसभेतील बहुमत चाचणीत नापास होण्याच्या भीतीने मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी शनिवारी (19 मे) परीक्षेआधीच माघार घेतली.

Karnataka Floor Test : Kumaraswamy fixed the time of oath ceremony under the astrologers guidance | Karnataka Floor Test: ज्योतिषांना विचारून कुमारस्वामींनी ठरवला शपथविधीचा मुहूर्त, बुधवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

Karnataka Floor Test: ज्योतिषांना विचारून कुमारस्वामींनी ठरवला शपथविधीचा मुहूर्त, बुधवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

Next

बेंगळुरूः कर्नाटक विधानसभेतील बहुमत चाचणीत नापास होण्याच्या भीतीने मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी शनिवारी (19 मे) परीक्षेआधीच माघार घेतली. त्यामुळे काँग्रेस-जेडीएस युतीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार एचडी कुमारस्वामींचा मार्ग मोकळा झाला असून त्यांनी लगेचच ज्योतिषांच्या सल्ल्याने शपथविधीचा मुहूर्त ठरवला आहे. मात्र, कुमारस्वामी आता सोमवार (21 मे) ऐवजी बुधवारी 23 मे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.  23 मे रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास ते शपथ घेणार आहेत. यापूर्वी, ज्योतिषांशी बोलून त्यांनी सोमवारचा, १२.३० वाजताचा मुहूर्त ठरवला होता, अशी माहिती समोर आली होती.  

कर्नाटकात बहुमताचा आकडा गाठण्यासाठी बराच आटापिटा करूनही भाजपाला ते जमलं नाही. १५ दिवसांत १०४ वरून ११२ जागांवर जाण्याचं गणित त्यांनी मांडलं होतं. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने एका दिवसांत बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आणि इथेच भाजपाची कोंडी झाली. सकाळी 'शत-प्रतिशत' बहुमत सिद्ध करण्याची भाषा करणारे येडियुरप्पा दुपारी अचानक भावुक झाले आणि त्यांनी बहुमत चाचणीआधीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. काँग्रेस-जेडीएससाठी हा मोठाच विजय ठरला असून ते सत्तास्थापनेसाठी सज्ज झाले आहेत. 

काँग्रेस-जेडीएस नेते आता राज्यपाल वजुभाई वाला यांच्या आमंत्रणाची वाट पाहताहेत. जेडीएस नेते कुमारस्वामी यांनी परवाच त्यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला होता. येडियुरप्पा 'विश्वास' जिंकण्यात अपयशी ठरल्यानंतर त्यांनी आता शपथविधीची तयारीही सुरू केली आहे. या सोहळ्यासाठी त्यांनी भाजपाविरोधी पक्षांच्या नेत्यांना आमंत्रण देण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या शपथविधीला उपस्थित राहणार असल्याचं समजतं.



 



 



 





 





 



 


 




 

Web Title: Karnataka Floor Test : Kumaraswamy fixed the time of oath ceremony under the astrologers guidance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.