'हे' आहेत औट घटकेचे सात मुख्यमंत्री, येडियुरप्पांचा नंबर पहिला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2018 06:49 PM2018-05-19T18:49:08+5:302018-05-19T23:49:50+5:30
कर्नाटक विधानसभेत बहुमत चाचणीआधीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानं भाजपा नेते येडियुरप्पा हे सव्वा दोन दिवसांचे मुख्यमंत्री ठरलेत.
बंगळुरूः कर्नाटक विधानसभेत बहुमत चाचणीआधीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानं भाजपा नेते येडियुरप्पा हे सव्वा दोन दिवसांचे मुख्यमंत्री ठरलेत. अवघे 55 तास ते मुख्यमंत्री होते. त्यामुळे औट घटकेच्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत ते सगळ्यात वरच्या स्थानी विराजमान झाले आहेत. या यादीत आणखी कोण-कोण नेते आहेत आणि ते किती दिवस मुख्यमंत्री होते पाहू या...
औट घटकेचे मुख्यमंत्रीः
१. येडियुरप्पा (कर्नाटक) - 55 तास (सव्वा दोन दिवस)
२. जगदंबिका पाल (उत्तर प्रदेश) - तीन दिवस
३. सतीश प्रसाद सिंग (बिहार) - पाच दिवस
४. जानकी रामचंद्रन (तामिळनाडू) - 24 दिवस
५. बी पी मंडल (बिहार) - 31 दिवस
६. एन भास्कर राव (आंध्र प्रदेश) - 31 दिवस
७. सी एच मोहम्मद कोया (केरळ) - 45 दिवस.