धक्कादायक! 500 रुपयांचं कर्ज फेडू न शकल्यानं मित्रानं मित्राच्याच पत्नीबरोबर केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 12:24 PM2018-09-26T12:24:48+5:302018-09-26T12:25:08+5:30

कर्नाटकातील एका व्यक्ती फक्त 500 रुपयांच्या कर्जासाठी चक्क स्वतःच्या पत्नीचं मित्राबरोबर लग्न लावून दिलं आहे.

karnataka friend fails to repay only 500 rupees debt man marries his wife | धक्कादायक! 500 रुपयांचं कर्ज फेडू न शकल्यानं मित्रानं मित्राच्याच पत्नीबरोबर केलं लग्न

धक्कादायक! 500 रुपयांचं कर्ज फेडू न शकल्यानं मित्रानं मित्राच्याच पत्नीबरोबर केलं लग्न

Next

बेळगाव- कर्जाच्या वाढत्या बोज्यामुळे शेतक-यांच्या आत्महत्या या बातम्या आपण वाचल्याच असतील. परंतु कर्नाटकातील एका व्यक्तीनं मित्र फक्त 500 रुपयांचं कर्ज फेडू शकत नसल्यानं चक्क त्याच्या पत्नीबरोबरच लग्न केलं आहे. या प्रकारानं कर्नाटकात एकच खळबळ उडाली आहे. बेळगावात राहणा-या एका व्यक्तीनं पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयाबाहेर धरणे धरली. त्या व्यक्तीचा आरोप आहे की, मित्रानं त्याच्या पत्नीचं अपहरण करत तिच्याशी लग्न केलं आहे.

पीडित व्यक्तीनं पत्नीला परत करण्याची प्रशासनाकडे मागणी केली आहे. या प्रकरणाच्या मागे कथित स्वरूपात कर्जाची बाब समोर आली आहे. मी 500 रुपयांचं कर्ज न फेडल्यामुळे माझ्या मित्रानं माझ्या पत्नीशी लग्न केल्याचा पीडित व्यक्तीचा आरोप आहे. परंतु हे प्रकरण फारच गुंतागुंतीचं असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. शाहपूरमधल्या एका हॉटेलमध्ये हे दोघे मित्र एकत्र काम करत होते. बसवराज याची पत्नी पार्वतीसुद्धा या हॉटेलमध्ये काम करत होती. ती आणि रमेश एकमेकांच्या संपर्कात होते. 2011मध्ये बसवराज आणि पार्वती यांचा विवाह झाला. त्यांना तीन वर्षांची एक मुलगीसुद्धा आहे.

बसवराजचा आरोप आहे की, दोन महिन्यांपूर्वी रमेशनं पार्वतीचं अपहरण केलं आणि कर्ज न फेडल्याच्या कारणास्तव तिच्याशी लग्न केलं. बसवराजच्या माहितीनुसार, पार्वती त्याच्या दुस-या बाळाची आई बनणार आहे. तर दुसरीकडे रमेशनं लग्नानंतर पार्वतीला माहेरी पाठवलं. पत्नीला मी रमेशविरोधात तक्रार करण्यास सांगितलं होतं. परंतु तिने ते गांभीर्यानं घेतलं नाही. गेल्या दोन महिन्यांपासून रमेश पार्वतीबरोबर वास्तव्याला आहे आणि ती माझ्याकडे येण्यास नकार देत असल्याचंही बसवराज यानं सांगितलं आहे.

Web Title: karnataka friend fails to repay only 500 rupees debt man marries his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न