मी बाबांसोबतच वाढदिवस साजरा करणार...! वडिलांचा कोरोनाने मृत्यू, मुलीनं कबरेजवळ कापला केक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 06:03 PM2021-09-03T18:03:24+5:302021-09-03T19:51:57+5:30

वडिलांच्या समाधीसमोर उभे राहून स्पंदना कोनासागर हिने वडिलांना श्रद्धांजली वाहिली. ती म्हणाली, 'मला असे वाटते, की माझे वडील अजूनही आजूबाजूलाच आहेत आणि ते या विशेष दिवशी मला पाहत आशीर्वाद देत आहेत...'

karnataka girl celebrate her eight birthday near father mausoleum in Koppal district | मी बाबांसोबतच वाढदिवस साजरा करणार...! वडिलांचा कोरोनाने मृत्यू, मुलीनं कबरेजवळ कापला केक

मी बाबांसोबतच वाढदिवस साजरा करणार...! वडिलांचा कोरोनाने मृत्यू, मुलीनं कबरेजवळ कापला केक

googlenewsNext

कोप्पल - तीन महिन्यांपूर्वी, चिमुकल्या स्पंदनाच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले. तिचे वडील तिचा वाढदिवस अत्यंत थाटात साजरा करत. मात्र यावेळी, ते तिच्या वाढदिवसासाठी तिच्यासोबत नव्हते. यामुळे स्पंदनाने तिचा वाढदिवस वडिलांच्या कबरीजवळ जाऊन साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि तिच्या आठव्या वाढदिवसाचा केक कापला. ही भावूक करणारी घटना आहे कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यातील. येथील कुश्तगी तालुक्यात, स्पंदनाने सुमारे डझनभर कुटुंबीयांना सोबत घेऊन वडिलांच्या कबरेजवळ (थडगे) गेली आणि केक कापून वाढदिवस साजरा केला. (karnataka girl celebrate her eight birthday near father mausoleum in Koppal district)

वडिलांना वाहिली श्रद्धांजली -
वडिलांच्या समाधीसमोर उभे राहून स्पंदना कोनासागर हिने वडिलांना श्रद्धांजली वाहिली. ती म्हणाली, 'मला असे वाटते, की माझे वडील अजूनही आजूबाजूलाच आहेत आणि ते या विशेष दिवशी मला पाहत आशीर्वाद देत आहेत. माझ्या आयुष्यातील ही एक संस्मरणीय घटना आहे आणि मी येथे प्रत्येक विशेष प्रसंगी माझ्या वडिलांचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे येत जाईन.

'राजकीय रॅलीदरम्यान झाला कोरोना' -
डोळ्यातील अश्रू पुसत स्पंदनाची आई रुपा म्हणाल्या, "मी मे महिन्यात माझे पती महेश कोनासागर यांना गमावले. ते समाजिक कार्यकर्ता होते. एका राजकीय सभेत सहभागी झाल्यानंतर त्यांना ताप आला होता. नंतर, डॉक्टरांनी ते कोविड पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. 13 मे रोजी त्यांचे निधन झाले. आमच्या शेतातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

CoronaVirus: देशात नव्या रुग्णांची दोन महिन्यांतील सर्वाधिक संख्या; केरळसह महाराष्ट्रात सर्वांत जास्त रुग्ण

वडिलांची खूप आठवण येते -
स्पंदना ही रुपा आणि महेश यांची एकुलती एक मुलगी आहे. ती म्हणाली, वडिल माझा वाढदिवस नेहमीच थाटात साजरा करत असत. 'जेव्हा, आईने त्याच्या मृत्यूसंदर्भात मला सांगितले, तेव्हा माझा विश्वासच बसत नव्हता. मला त्यांची खूप आठवण येते.'

रूपा म्हणाल्या, स्पंदनाला या सर्व घटनेतून सावरायला बराच वेळ लागला. जेव्हा आम्ही तिचा आठवा वाढदिवस घरी साजरा करायचे ठरवले, तेव्हा ती म्हणाली, की तिला तिच्या वडिलांच्या समाधीस्थळी जाऊन वाढदिवस साजरा करायची इच्छा आहे. यानंतर आम्ही तिथेच तिचा वाढदिवस साजरा केला.

Web Title: karnataka girl celebrate her eight birthday near father mausoleum in Koppal district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.