कर्नाटक-गोव्यातील पाणीप्रश्न पेटला

By admin | Published: August 27, 2015 12:20 AM2015-08-27T00:20:28+5:302015-08-27T00:20:28+5:30

- रास्ता रोको, दगडफेक : हुबळी, धारवाडमध्ये उत्स्फूर्त बंद

Karnataka-Goa water dispute | कर्नाटक-गोव्यातील पाणीप्रश्न पेटला

कर्नाटक-गोव्यातील पाणीप्रश्न पेटला

Next
-
ास्ता रोको, दगडफेक : हुबळी, धारवाडमध्ये उत्स्फूर्त बंद
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील कर्नाटक-गोवा सीमेवर असलेल्या कळसा भांडुरा प्रकल्पाच्या म्हादई नदीच्या पाण्यावरून कर्नाटक, गोवा पाणी तंटा पुन्हा एकदा पेटला आहे. कणकुंबी येथील कळसा आणि भांडुरा योजनेचे पाणी हुबळी, धारवाडसह उत्तर कर्नाटकला मिळावे, या मागणीसाठी बुधवारी पुकारलेल्या हुबळी आणि धारवाड बंदला उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. मात्र अनेक दगडफेकीच्या घटना घडल्या असून रास्ता रोकोही करण्यात आला.
खानापूर येथे मंगळवारी रात्री आंदोलकांनी धारवाड येथे गोवा परिवहन मंडळाची बस जाळली, तर केशापूर बस आगारात गोव्याच्या चार बस आणि कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसवरदेखील दगडफेक करण्यात आली आहे. बुधवारी धारवाड, हुबळी बंदची हाक दिली होती. दोन्ही शहरांतील सरकारी कार्यालये, शिक्षण संस्था बंद होत्या.
कळसा, भांडुरा नाल्यांना म्हादई नदीला जोडून उत्तर कर्नाटकास पाणी मिळावे, या मागणीसाठी दोन दिवसांपूर्वी कर्नाटकचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला गेले होते. या शिष्टमंडळास पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे हे आंदोलन अधिकच तीव्र झाले. गोवा, कर्नाटक मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावून ही समस्या सोडविण्याची मागणी कर्नाटकातील आंदोलकांनी केली आहे.
-----
हा आहे वाद...
खानापूरमधील म्हादई नदीचे नैसर्गिकरित्या गोव्याकडे वाहणारे पाणी कळसा-भांडुरा प्रकल्पामधून उत्तर कर्नाटकातील हुबळी, धारवाड, बागलकोटकडे वळविण्याच्या योजनेस गोवा सरकारचा आक्षेप आहे. गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, न्यायालयाने लवाद नेमला आहे. या लवादाने या प्रकल्पास स्थगिती दिली आहे.

Web Title: Karnataka-Goa water dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.