कोरोना संकटात "या" सरकारने गरजूंसाठी उघडली तिजोरी; 1250 कोटींच्या Relief Package ची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 05:40 PM2021-05-19T17:40:54+5:302021-05-19T17:50:27+5:30

1250 Crore Relief Package Due To Corona Pandemic : रिलीफ पॅकेजच्या माध्यमातून बांधकामाशी संबंधित कामगार, रिक्षा-टॅक्सी ड्रायव्हर, फिल्मलाईनमधले वर्कर्स, फुटपाछवर भाज्या वेळ विकणारे लोक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील गरजू लोकांनी मदत मिळणार आहे.

karnataka government announces rs 1250 crore relief package due to corona pandemic | कोरोना संकटात "या" सरकारने गरजूंसाठी उघडली तिजोरी; 1250 कोटींच्या Relief Package ची मोठी घोषणा

कोरोना संकटात "या" सरकारने गरजूंसाठी उघडली तिजोरी; 1250 कोटींच्या Relief Package ची मोठी घोषणा

Next

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग (Corona Pandemic) रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. तसेच दोन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. लॉकडाऊनचा फटका हा सर्वच क्षेत्रांना बसला आहे. अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. तसेच हातावरचं पोट असणाऱ्यांची परिस्थिती तर अत्यंत बिकट झाली आहे. याच दरम्यान कोरोना संकटात कर्नाटक सरकारने (Karnataka Government-) गरजूंसाठी आपली तिजोरी उघडली आहे. तब्बल 1250 कोटींच्या कोविड रिलीफ पॅकेजची (Relief Package) मोठी घोषणा केली आहे. 

कर्नाटक सरकारने आता 1250 कोटी रुपयांचं कोविड रिलीफ पॅकेज जाहीर केलं आहे. या पॅकेजच्या माध्यमातून बांधकामाशी संबंधित कामगार, रिक्षा-टॅक्सी ड्रायव्हर, फिल्मलाईनमधले वर्कर्स, फुटपाथवर भाज्या-फळे विकणारे लोक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील गरजू लोकांना आर्थिक मदत मिळणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी या रिलीफ पॅकेजची घोषणा केली आहे. वरिष्ठ अधिकाऱी आणि कॅबिनेट मंत्र्यांसोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीदरम्यान हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आमच्या सरकारने गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनच्या काळातही असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत दिली होती. आता पुन्हा एकदा ती देणार असल्याची घोषणा करत असल्याचं म्हटलं आहे. 

शेतकऱ्यांसह असंघटित क्षेत्रांमधील कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहत आहे. त्यामुळे आम्ही 1250 कोटींहून अधिकचं पॅकेज जाहीर करत आहोत, असं मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी सांगितलं. तसेच आम्ही जे काही करु शकत होतो ते आम्ही केलं आहे आणि यापुढेही गरज लागल्यास आम्ही करायला तयार आहोत असंही म्हटलं आहे. लॉकडाऊन वाढवायचा की नाही यावरही विचार चालू असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. लॉकडाऊन संदर्भातील निर्णय 24 मेपर्यंत जाहीर करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सध्या 24 मेपर्यंत लॉकडाऊन लागू असणार आहे. 10 मेपासून 24 मेपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

नोंदणीकृत बांधकाम कर्मचारी आणि मजुरांना प्रत्येकी 3000 रुपयांचं अर्थसाहाय्य दिलं जाणार आहे. हे एकूण पॅकेज 494 कोटी रुपयांचं आहे. तर सलून चालक, टेलर, घरकाम करणारे, मॅकेनिक अशा असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना प्रत्येकी 2000 रुपये देण्यात येणार आहेत. तर फिल्मलाईन वर्कर्सला 3 हजार देण्यात येणार आहेत. गरीब कल्याण योजने अंतर्गत गरजूंना 5 किलो तांदूळ देण्यात येणार आहेत. कर्नाटकमध्ये देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. तसेच मृतांची संख्यादेखील वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Web Title: karnataka government announces rs 1250 crore relief package due to corona pandemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.