कर्नाटकात टीपू सुलतान जयंतीवर बंदी, येडियुरप्पा सरकारचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 04:23 PM2019-07-30T16:23:30+5:302019-07-30T16:27:48+5:30
'कडगु लोकांच्याविरोधात टीपू सुलतान यांनी कोणत्याही कारणाशिवाय युद्ध केले होते.'
बंगळुरु : कर्नाटकातील नव्या भाजपा सरकारने टीपू सुलतान जयंती साजरी करण्यावर बंदी घातली आहे. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत टीपू सुलतान यांची जयंती साजरी न करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, मुख्यमंत्री कार्यालयाकडून कन्नड संस्कृती विभागाला यासंबंधीचे आदेश देण्यात आले आहेत.
भाजपाचे आमदार के. जी. बोपय्या यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना पत्र लिहून टीपू सुलतान जयंती साजरी करण्याला विरोध दर्शवला होता. 'कडगु लोकांच्याविरोधात टीपू सुलतान यांनी कोणत्याही कारणाशिवाय युद्ध केले होते. या युद्धात कडगु लोग मोठ्या प्रमाणात शहीद झाले होते', असे के. जी. बोपय्या यांनी पत्रात म्हटले आहे.
Chief Minister BS Yediyurappa led Karnataka Government orders Kannada & Culture Department, to not celebrate Tipu Jayanti. The decision was taken during yesterday's cabinet meeting. (file pic) pic.twitter.com/6slPyDaq8w
— ANI (@ANI) July 30, 2019
दरम्यान, कर्नाटकात 2015 मध्ये तत्कालीन काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने भाजपाचा विरोध असताना टीपू सुलतान जयंतीनिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर काँग्रेस-जेडीएस सरकारच्या काळात टीपू सुलतान जयंती धुमधडाक्यात साजरी करण्यात येत होती. मात्र, आता काँग्रेस-जेडीएस सरकार कोसळल्यानंतर सत्तेवर आलेल्या बी. एस. येडियुरप्पा यांनी टीपू सुलतान जयंती साजरी न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे यावरुन कर्नाटकातील राजकारण वातावरण तापण्याची शक्यता आहे.