Karnataka Hijab controversy: मी हिंदू मित्रांमध्ये स्वत:ला सुरक्षित समजते, मुस्कानने सांगितली ईनसाईड स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 03:29 PM2022-02-09T15:29:11+5:302022-02-09T15:32:42+5:30

कर्नाटकच्या एका कॉलेजमधील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जिथे मुस्कान नावाची एक तरुणी हिजाब घालून कॉलेजमध्ये येते. तेव्हा तिथे असलेला जमाव तरुणीच्या दिशेने येतो

Karnataka Hijab controversy: I feel safe among Hindu friends, Karnakata viral girl Muskan told Inside Story of hijab | Karnataka Hijab controversy: मी हिंदू मित्रांमध्ये स्वत:ला सुरक्षित समजते, मुस्कानने सांगितली ईनसाईड स्टोरी

Karnataka Hijab controversy: मी हिंदू मित्रांमध्ये स्वत:ला सुरक्षित समजते, मुस्कानने सांगितली ईनसाईड स्टोरी

googlenewsNext

बंगळुरू - कर्नाटकमध्ये हिजाब विरुद्ध भगवा वाद चिघळला आहे. ही परिस्थिती पाहता, राज्यातील सर्व शिक्षणसंस्था 3 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हिजाब बंदीवरून कर्नाटकमध्ये विविध ठिकाणी काही गटांमध्ये वादावादी झाली. हिजाब बंदीचे प्रकरण न्यायलयात गेले असून, याप्रकरणी न्यायालयाने बुधवारपर्यंत सुनावणी तहकूब केली. दरम्यान, कॉलेज परसरात एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मुस्कान असं या मुलीचं नाव असून या वादावर तिने आपलं मत व्यक्त केलं आहे. 

कर्नाटकच्या एका कॉलेजमधील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जिथे मुस्कान नावाची एक तरुणी हिजाब घालून कॉलेजमध्ये येते. तेव्हा तिथे असलेला जमाव तरुणीच्या दिशेने येतो. त्यानंतर या तरुणीच्या समोर घोषणा दिल्या जातात. तेव्हा ही तरुणीही प्रत्युत्तरदाखल घोषणा देताना दिसते. या तरुणीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना कर्नाटकच्या मांड्या येथे घडली आहे. या घटनेनंतर तिला अनेकांचे फोन येत आहेत. तसेच, मीडियाचे प्रतिनिधीही तिच्याशी संपर्क साधत आहेत. या वादावर तिने मत व्यक्त केलं आहे. 

मुस्कान म्हणते की, अनेकांचे मला फोन येत आहेत, माझे मित्र, हिंदू मित्र देखील माझ्या समर्थनार्थ आहेत. मी आणि माझ्या इतर मुस्लीम मैत्रिणीहिंदू मित्रांमध्ये स्वत:ला सुरक्षित समजतो. आमच्यामध्ये कधीही धर्माच्या गोष्टी होत नाहीत. हे सगळे बाहेरचे लोक करत आहेत. मी क्लासमध्ये हिजाब परिधान करते आणि बुरखा काढून टाकते. आजपर्यंत प्राचार्य किंवा टीचर्संने काहीही म्हटले नाही. हे सगळं बाहरेचे लोकं येऊन करत आहेत. हिजाब आमचा एक भाग आहे, तो आमचा धर्म आहे, त्यासाठीचा विरोध आम्ही सुरूच ठेवणार, असे मुस्कानने म्हटले आहे. तसेच, माझ्या कॉलेजमधील शिक्षक आणि प्राचार्यांनी गर्दीपासून मला सुरक्षित ठेवले, असेही तिने सांगितले.

दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. 

मलाला युसुफजाई म्हणते...

नोबेल शांतता पारितोषिक विजेती आणि महिला हक्क कार्यकर्ती मलाला युसूफजई हिनेही हिजाबवरून कर्नाटकात सुरू असलेल्या वादात उडी घेतली आहे. मलालाने (Malala Yousafzai) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट करून या सर्व प्रकरणावर भाष्य केलं आहे. "कॉलेज आम्हाला अभ्यास आणि हिजाब यापैकी एक निवडण्यास भाग पाडत आहे. मुलींना त्यांच्या हिजाबमध्ये शाळेत प्रवेश नाकारला जाणे हे भयावह आहे. कमी किंवा जास्त कपडे घातल्याने महिलांच्या वस्तुनिष्ठतेवर आक्षेप घेतला जात आहे. भारतीय नेत्यांनी मुस्लिम महिलांना कमी लेखणं थांबवावं" असं मलालाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

काय आहे वाद?

- उडुपीमधील काही विद्यार्थिनींना हिजाब परिधान केल्यामुळे वर्गात प्रवेश नाकारण्यात आला होता. 
- त्याविरोधात त्या मुलींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. हिजाब घालू न देणे हे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Karnataka Hijab controversy: I feel safe among Hindu friends, Karnakata viral girl Muskan told Inside Story of hijab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.