"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 04:59 PM2024-05-28T16:59:08+5:302024-05-28T17:00:48+5:30

Prajwal Revanna sexual abuse case : २८ एप्रिल रोजी राज्य सरकारने प्रज्वल रेवन्ना यांच्या विरोधात तपासासाठी एसआयटी स्थापन केली होती.

Karnataka Home Minister Parameshwara says SIT will arrest Prajwal once he returns to India | "कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"

"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"

बंगळुरू : सध्या कर्नाटकात खासदार प्रज्वल रेवन्ना प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. हसनचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्यावर अनेक महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. सध्या ते देशातून फरार झाले आहेत. दरम्यान, याप्रकरणी कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी भाष्य केले आहे. प्रज्वल रेवन्ना भारतात येताच त्यांना अटक केली जाईल, असे जी. परमेश्वर यांनी म्हटले आहे.

प्रज्वल रेवन्ना हे ३१ मे पर्यंत भारतात परतले नाहीत, तर त्यांना परदेशातून परत आणण्याची पुढील प्रक्रिया सुरू होईल. भारतात येताच त्यांना अटक केली जाईल. तसेच, आरोपी खासदाराच्या अटकेबाबत अंतिम निर्णय विशेष तपास पथकाने (एसआयटी) घ्यायचा आहे, असे  जी. परमेश्वर म्हणाले. दरम्यान, २८ एप्रिल रोजी राज्य सरकारने प्रज्वल रेवन्ना यांच्या विरोधात तपासासाठी एसआयटी स्थापन केली होती.

जी. परमेश्वर यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी आम्ही प्रज्वल रेवन्ना यांना परत आणण्यासाठी देशभरात सर्व प्रयत्न केले आहेत. आम्ही केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे, आम्ही त्याच्याविरुद्ध वॉरंट मिळवले आहे, ज्याची माहिती आम्ही गृह आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला दिली आहे. याशिवाय, ब्लू कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली आहे. यातच त्यांनी आपल्या परतण्याबद्दल एक व्हिडिओ संदेश जारी केला. प्रज्वल रेवन्ना यांचा परत येण्याचा निर्णय योग्य आहे कारण कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही."

पुढे जी. परमेश्वर म्हणाले, "असे म्हटले जात आहे की जर ते निवडणुकीत हरले तर त्यांचे सदस्यत्व संपुष्टात येईल आणि त्यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्टही जप्त केला जाईल. या सगळ्याचा विचार करून त्यांनी परत येण्याचा निर्णय घेतला असावा. ते परतल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया सुरू होईल. तसेच, मला माहित नाही की त्यांनी तो व्हिडिओ कशामुळे रिलीज केला… ३१ मे रोजी काय होते ते आपण पाहू. ते आले नाहीत तर पुढची प्रक्रिया सुरू होईल."

दरम्यान, हसन लोकसभा जागेवर मतदान केल्यानंतर प्रज्वल रेवन्ना हे २७ एप्रिल रोजी जर्मनीला गेले होते. आता ते फरार आहेत. एसआयटीने केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) मार्फत इंटरपोलकडून प्रज्वल रेवन्ना यांच्या ठावठिकाणाविषयी माहिती मागवली होती, ज्यासाठी इंटरपोलने 'ब्लू कॉर्नर नोटीस' जारी केली आहे. एसआयटीने अर्ज दाखल केल्यानंतर १८ मे रोजी खासदार/आमदारांविरुद्धच्या खटल्यांच्या सुनावणीसाठी स्थापन केलेल्या विशेष न्यायालयाने प्रज्वल रेवन्ना यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते.
 

Web Title: Karnataka Home Minister Parameshwara says SIT will arrest Prajwal once he returns to India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.