गुजरात काँग्रेसचे आमदार थांबलेल्या रिसॉर्टवर आयकर विभागाचा छापा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2017 09:28 AM2017-08-02T09:28:37+5:302017-08-02T13:39:46+5:30

बुधवारी सकाळी आयकर विभागाने कर्नाटकचे ऊर्जा मंत्री डीके शिवकुमार यांच्या घरावर छापा टाकला

Karnataka Income Tax Minister GK Shivkumar's house raids by Income Tax Department | गुजरात काँग्रेसचे आमदार थांबलेल्या रिसॉर्टवर आयकर विभागाचा छापा

गुजरात काँग्रेसचे आमदार थांबलेल्या रिसॉर्टवर आयकर विभागाचा छापा

googlenewsNext
ठळक मुद्देबुधवारी सकाळी आयकर विभागाने कर्नाटकचे ऊर्जा मंत्री डी.के शिवकुमार यांच्या घरावर छापा टाकलागुजरातमधील काँग्रेसच्या 44 आमदारांना ज्या रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलं आहे त्या रिसॉर्टवरही आयकर विभागाने छापेमारी केली आहे. बुधवारी सकाळी सात वाजता आयकर विभागाने ही छापेमारी केली आहे

नवी दिल्ली, दि. 2-  बुधवारी सकाळी आयकर विभागाने कर्नाटकचे ऊर्जा मंत्री डीके शिवकुमार यांच्या घरावर छापा टाकला. तसंच गुजरातमधील काँग्रेसच्या 44 आमदारांना ज्या रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलं आहे त्या रिसॉर्टवरही आयकर विभागाने छापेमारी केली आहे. बुधवारी सकाळी सात वाजता आयकर विभागाने ही छापेमारी केली आहे. गुजरातमधील काँग्रेसचे 44 आमदार रिसॉर्टमध्ये असताना ऊर्जामंत्री डीके शिवकुमार त्यांचे इनचार्ज होते. 8 ऑगस्ट रोजी होणाऱ्या गुजरात राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील गळती थांबविण्यासाठी या 44 आमदारांना बंगळुरूतील रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलं होतं. भाजपने सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचं मत काँग्रेसकडून व्यक्त केलं जातं आहे. ईगलटन रिसॉर्टकडून जर काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील, तर कारवाई योग्य असल्याचं भाजपचं म्हणणं आहे. 


आयकर विभागाने डी.के शिवकुमार, डीके सुरेश आणि काँग्रेसचे विधानपरिषदेचे सदस्य एस रवि यांच्या घरावर छापे टाकले आहेत. काँग्रेस पक्षाच्या जवळचे समजले जाणारे डीके शिवकुमार आणि डीके सुरेश हे त्या भागात डीके ब्रदर्स नावाने प्रसिद्ध आहे. आयकर विभागाने कारवाईचा भाग म्हणून ईगलटन रिसॉर्टवरही धाड टाकली. ईगलटन रिसॉर्ट शहरापासून 60 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बिदादी इंडस्ट्रिअल एरियात आहे. या रिसॉर्टमध्ये एका खोलीचं एका दिवसाचं भाड दहा हजार रूपये आहे. तसंच या भागात अनेक मल्टिनॅशनल कंपन्यांची कार्यालयं आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार डीके सुरेश यांनी त्या रिसॉर्टमध्ये काँग्रेसच्या 44 आमदारांसाठी प्रत्येक प्रकारची सुविधा उपलब्ध केली होती. तसंच इतर सुविधांसाठी त्यांनी एस रवि यांची मदत घेतली होती.  

कोण आहेत डीके ब्रदर्स?
डीके शिवकुमार हे कर्नाटक सरकारमध्ये ऊर्जा मंत्री पदावर आहेत. जर डीके सुरेश हे बंगळुरू ग्रामीण मतदारसंघाचे खासदार आहेत. ज्या भागात काँग्रेसच्या 44 आमदारांना ठेवण्यात आलं होतं, तो भाग डीके सुरेश यांच्या मतदारसंघात येतो. अनेक राजकीय जाणकार डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानतात. गेल्या निवडणुकीत जेव्हा काँग्रेसने या भागात स्पष्ट बहुमत मिळवलं तेव्हा शिवकुमार कनकपुरा भागातून एक लाखपेक्षा जास्त मतांनी निवडून आले होते.  

44 आमदारांना बंगळुरूला हलवलं
गुजरातमध्ये ८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या ४४ आमदारांना भाजपाच्या ‘शिकारी’पासून वाचविण्यासाठी बंगळुरूत हलविलं. काँग्रेसच्या सहा आमदारांनी राजीनामा दिला असून, त्यातील तीन भाजपात दाखल झाले आहेत.काँग्रेसचे नेते अहमद पटेल गुजरातमधून राज्यसभा निवडणूक लढवीत आहेत. पक्षाच्या ५७ पैकी ६ आमदारांनी राजीनामा दिल्याने संकट उभे ठाकले आहे. काँग्रेसचे महासचिव निशित व्यास म्हणाले की, ४४ आमदारांना बंगळुुरूला हलविले आहे. व्यास या आमदारांसोबत आहेत. सुरक्षेसाठी हे पाऊल उचलले आहे. या आमदारांना धमक्या दिल्या जात आहेत, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी काँग्रेसचा हा आरोप खोडून काढताना हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. आमचा याच्याशी संबंध नाही, असा दावा केला.
 

 

Web Title: Karnataka Income Tax Minister GK Shivkumar's house raids by Income Tax Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.