धक्कादायक! वाळू माफियांना तपासासाठी थांबवले म्हणून पोलिसाला ट्रकखाली चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 03:00 PM2023-06-16T15:00:35+5:302023-06-16T15:02:14+5:30

कर्नाटकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

karnataka kalaburagi sand mafia truck crushes police constable to death | धक्कादायक! वाळू माफियांना तपासासाठी थांबवले म्हणून पोलिसाला ट्रकखाली चिरडले

धक्कादायक! वाळू माफियांना तपासासाठी थांबवले म्हणून पोलिसाला ट्रकखाली चिरडले

googlenewsNext

कर्नाटकातील कलबुर्गी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाळू माफियांनी एका पोलीस कॉनस्टेबलला ट्रकखाली चिरडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कलबुर्गी जिल्ह्यातील आहे. बेकायदेशीरपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकने कॉन्स्टेबलला चिरडले. कलबुर्गी जिल्ह्यातील जिवरगीच्या नारायणपूर गावात ही घटना उघडकीस आली आहे. सध्या पोलीस कॉन्स्टेबलला ट्रकने चिरडणाऱ्या चालकाला अटक करण्यात आली आहे.

धक्कादायक! युवकाला स्वप्नात दिसला चोर; स्वतःवरच झाडली गोळी अन्...

५१ वर्षीय हेड कॉन्स्टेबल एम चौहान यांनी नारायणपूर गावातून जाणारा वाळूचा ट्रक थांबवण्याचा सिग्नल दिला. या वाळूचे अवैध उत्खनन होत आहे की वाहतूक केली जात नाही, याचा तपास पोलीस हवालदार यांना करायचा होता. त्यांनी ट्रकचालकाला थांबण्याचा इशारा केला असता, तसे न करता चालकाने ट्रकचा वेग वाढवला. त्यामुळे कॉन्स्टेबलला चिरडत ट्रक पुढे गेला. या घटनेत एम चौहान यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आम्ही चालकाला अटक केली आहे. सिधाना अशी त्याची ओळख पटली आहे. ट्रकमध्ये वाळूची वाहतूक केली जात असून, त्यावेळी पोलीस हवालदार चौहान अवैध धंदे रोखण्यासाठी गस्तीवर होते. पोलिसांनी ट्रक आपल्या ताब्यात घेतला आहे. भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेवर कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. अवैध वाळू उत्खननावर तात्काळ कारवाई करण्याचे सक्त आदेश त्यांनी पोलीस विभागाला दिल्याचे खरगे यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

कर्नाटकात अवैध वाळू उत्खननाची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. २०१८ मध्ये मूलारपटना पूल कोसळला होता, त्यानंतर अवैध वाळू उत्खननाबाबत बरीच चर्चा झाली होती. वाळू माफिया पुलाच्या पायथ्याजवळ खोदकाम करून येथून वाळू उपसा करत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे पूल कमकुवत होऊन नंतर पडला.

Web Title: karnataka kalaburagi sand mafia truck crushes police constable to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.