Karnataka Lok Sabha Election Result 2024 : प्रज्वल रेवन्ना ८ हजार मतांनी पुढे; JDS बाजी मारेल? काँग्रेसचे श्रेयस पटेल पिछाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 12:02 PM2024-06-04T12:02:30+5:302024-06-04T12:03:55+5:30

Karnataka Lok Sabha Election 2024 Result: माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आणि कर्नाटकातील हसन मतदारसंघातील जेडीएसचे निलंबित नेते तसेच उमेदवार प्रज्वल रेवन्ना यांना ३ लाखांहून अधिक मते मिळाली आहेत.

karnataka lok sabha election result 2024 jds candidate prajwal revanna take lead from hassan constituency congress shreyas patel behind | Karnataka Lok Sabha Election Result 2024 : प्रज्वल रेवन्ना ८ हजार मतांनी पुढे; JDS बाजी मारेल? काँग्रेसचे श्रेयस पटेल पिछाडीवर

Karnataka Lok Sabha Election Result 2024 : प्रज्वल रेवन्ना ८ हजार मतांनी पुढे; JDS बाजी मारेल? काँग्रेसचे श्रेयस पटेल पिछाडीवर

Karnataka Lok Sabha Election 2024 Result:प्रज्वल रेवन्ना प्रकरणावरून कर्नाटकातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले होते. माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आणि कर्नाटकातील हसन मतदारसंघातील जेडीएसचे निलंबित नेता प्रज्वल रेवन्ना (Prajwal Revanna) यांच्यावर अनेक महिलांनी लैंगिक छळ केल्याचे आरोप केले होते. या प्रकरणी प्रज्वल रेवन्ना यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रज्वल रेवन्ना यांना जेडीएस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली होती. हसन मतदारसंघात प्रज्वल रेवन्ना ८ हजार मतांनी पुढे असल्याचे पाहायला मिळत आहे. 

महिलांकडून लैंगिक छळाचे आरोप होताच प्रज्वल रेवन्ना जर्मनीला निघून गेले. सुमारे महिनाभर प्रज्वल रेवन्ना जर्मनीमध्ये होते. मात्र, अखेरीस ३५ दिवसांनंतर प्रज्वल रेवन्ना भारतात परत आले. बंगळुरू विमानतळावर उतरताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक करण्यात आली. न्यायालयासमोर हजर केल्यानंतर प्रज्वल रेवन्ना यांना ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 

लोकसभा निवडणुकीच्या निकालात आघाडी

हाती आलेल्या आकडेवारीनुसार, प्रज्वल रेवन्ना यांना सुमारे ३ लाख ५३ हजार १४५ च्या घरात मते मिळाली असून, ते ८ हजार मतांनी आघाडी असल्याचे सांगितले जात आहे. प्रज्वल रेवन्ना यांच्या विरोधात काँग्रेसने श्रेयस पटेल यांना उमेदवारी दिली असून, ते पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. अद्याप मतमोजणीच्या अनेक फेऱ्या बाकी आहेत. तसेच सुरुवातीचे कल वेगाने बदलताना दिसत आहे. त्यामुळे अंतिम निकाल काय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, कर्नाटकात भाजपा आणि जेडीएस युतीत लोकसभा निवडणूक लढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रज्वल रेवन्ना यांच्यासाठी प्रचारसभाही घेतली होती. 

 

Web Title: karnataka lok sabha election result 2024 jds candidate prajwal revanna take lead from hassan constituency congress shreyas patel behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.