कर्नाटक : म्हैसूरमध्ये रॅलीदरम्यान पंतप्रधान मोदींच्या वाहनाकडे फेकला मोबाईल, पोलिसांनी सांगितलं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 09:34 PM2023-04-30T21:34:07+5:302023-04-30T21:35:46+5:30
कर्नाटकातील म्हैसूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोदरम्यान मोबाईल फेकल्याची घटना समोर आली आहे.
कर्नाटकातील म्हैसूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोदरम्यान मोबाईल फेकल्याची घटना समोर आली आहे. निवडणूक प्रचारानिमित्त पंतप्रधान रविवारी म्हैसूरमध्ये आले होते. सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पंतप्रधान हात दाखवत समर्थकांना अभिवादन करत आहेत, तेव्हा मागून उडणारा एक मोबाइल त्यांच्या समोर येतो.
पंतप्रधानांच्या ताफ्याच्या वाहनावर हा मोबाईल पडल्याचं सांगण्यात येत आहे. एक महिला पंतप्रधानांचा व्हिडीओ बनवत असताना चुकून तिचा मोबाईल पडला. खास बनवलेल्या वाहनाच्या बोनेटवर तो मोबाईल पडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्साहाच्या भरात त्यांच्या हातून हा फोन फेकला गेला. हा फोन भाजपच्याच एका महिला कार्यकर्त्याचा होता. त्यांचा असा कोणताही चुकीचा हेतू नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.
पंतप्रधान मोदींच्या सभोवताली एसपीजी जवानांची सुरक्षा होती. ज्याचा मोबाईल पंतप्रधानांसमोर पडला त्या भाजपच्या कार्यकर्त्या होत्या. एसपीजीनं नंतर त्याचा मोबाईल परत केला. महिलेचा मोबाईल फेकण्याचा कोणताही चुकीचा हेतू नव्हता. उत्साहाच्या भरात त्यांच्या हातून मोबाईल पडल्याचं सांगण्यात आलं.
दावणगेरेत सुरक्षा भेदण्याच्या प्रयत्न
दावणगरेमध्ये पंतप्रधानंना रोड शो सुरू होता. तेव्हा दोन्ही बाजूला मोठी गर्दी होती. यादरम्यान, एकानं धावत पंतप्रधानांकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि तो त्यांच्या वाहनादवळ पोहोचला. ती व्यक्ती त्यांच्या ताफ्याजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करत होती. हा एक गंभीर प्रशअन मानला जात आहे. देल्या तीन महिन्यांमध्ये तिसऱ्यांदा असा प्रकार घडला आहे.