पेन्शनसाठी आजी पोस्ट ऑफिसच्या मारतेय चकरा; कुमारस्वामींनी केलं मदतीचं आवाहन, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 05:34 PM2024-01-17T17:34:04+5:302024-01-17T17:39:31+5:30

एक वृद्ध महिला आपल्या पेन्शनसाठी गेल्या दोन महिन्यांपासून पोस्ट ऑफिसमध्ये चकरा मारत आहे. 77 वर्षांच्या वृद्ध महिलेला चालायला त्रास होतो.

karnataka old age pension women crawled for 5km for pension since two months hd kumaraswamy | पेन्शनसाठी आजी पोस्ट ऑफिसच्या मारतेय चकरा; कुमारस्वामींनी केलं मदतीचं आवाहन, म्हणाले...

पेन्शनसाठी आजी पोस्ट ऑफिसच्या मारतेय चकरा; कुमारस्वामींनी केलं मदतीचं आवाहन, म्हणाले...

कर्नाटकातील दावणगेर जिल्ह्यातील एक वृद्ध महिला आपल्या पेन्शनसाठी गेल्या दोन महिन्यांपासून पोस्ट ऑफिसमध्ये चकरा मारत आहे. 77 वर्षांच्या वृद्ध महिलेला चालायला त्रास होतो. गेल्या दोन महिन्यांपासून महिलेला पेन्शनची रक्कम मिळत नाही. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर महिलेचा फोटो शेअर करताना, राज्यातील काँग्रेस सरकारने या वृद्ध महिलेचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, असं आवाहन केलं आहे.

77 वर्षीय गिरिजम्मा हे दावणगेर जिल्ह्यातील हरिहर तालुक्यातील कुनिबेलकर गावची रहिवासी आहे. माजी मुख्यमंत्र्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, "काँग्रेस शासित कर्नाटकची हीच खरी स्थिती आहे. गॅरेंटी देऊन लोकांचं जीवनमान सुधारत असल्याचं सरकार म्हणतं, पण वृद्ध महिलेची अवस्था पाहता जनजीवन रुळावरून घसरल्याचं दिसतं. महिन्याचं पेन्शन मिळवण्यासाठी 5 किलोमीटर रांगत येणाऱ्या या आजींना पाहून मन दु:खी झालं आहे."

एचडी कुमारस्वामी म्हणाले की, "वृद्ध महिलेची अवस्था पाहून आपल्या सर्वांची मान शरमेने झुकली आहे आणि सरकारच्या कार्यशैलीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. मुख्यमंत्री असताना समाजातील वंचित, वृद्ध, अपंग, विधवा यांच्यासाठी अनेक योजना राबवल्या. वृद्धांना देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. गरजूंना मदत करणे ही सरकारची जबाबदारी आहे. तुम्ही महिलांना 2000 रुपये देता पण त्या अगणित वृद्ध मातांचं काय? सरकारला दया येत नाही का?"

सरकारने योजना लागू केल्या आहेत आणि ही चांगली गोष्ट आहे मात्र सेवानिवृत्ती पेन्शन, विधवा पेन्शन, दिव्यांग महिलांना मिळणारं पेन्शन वेळेवर मिळायला हवं. वृद्ध महिलेला पेन्शन मिळवण्यासाठी असं यावं लागू नये आणि अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, शासनाने या मातेला तातडीने आवश्यक ती मदत करावी असं देखील एचडी कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे. 
 

Web Title: karnataka old age pension women crawled for 5km for pension since two months hd kumaraswamy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.