कर्नाटकात आयटीसोबतच इतर क्षेत्रातही आता महिला नाईट शिफ्ट करताना दिसणार

By admin | Published: February 16, 2016 04:37 PM2016-02-16T16:37:43+5:302016-02-16T16:47:54+5:30

राज्यातील अनेक कंपन्यांमध्ये महिलांना नाईटला काम करण्यास मुभा देण्याबाबत कर्नाटक सरकार विचार करत आहे. त्यामुळे फक्त आयटीमध्ये जॉब करणा-या महिलांसोबच आता इतर क्षेत्रात

In Karnataka, other women will also be seen in night shift while in other areas | कर्नाटकात आयटीसोबतच इतर क्षेत्रातही आता महिला नाईट शिफ्ट करताना दिसणार

कर्नाटकात आयटीसोबतच इतर क्षेत्रातही आता महिला नाईट शिफ्ट करताना दिसणार

Next
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. १६ - राज्यातील अनेक कंपन्यांमध्ये महिलांना नाईटला काम करण्यास मुभा देण्याबाबत कर्नाटक सरकार विचार करत आहे. त्यामुळे फक्त आयटीमध्ये जॉब करणा-या महिलांसोबच आता इतर क्षेत्रात म्हणजेच वस्तुनिर्मिती, वस्त्रोउद्योग आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये सुद्धा महिला नाईटला काम करताना दिसणार आहेत. 
महिलांना इतर क्षेत्रात नाईटला काम करण्यास परवानगी देण्याच्या योजनेवर काम करण्यात येत असून त्याला कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात येईल. त्यानंतर लवकरच या योजनेचा प्रस्ताव विधानसभेत सादर करण्यात येणार आहे. 
या योजणेच्या माध्यमातून राज्यात उद्योगजगताला चालना देण्यासाठी आणि अधिकाअधिक महिलांसाठी नोक-या उपलब्ध करुन देण्यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे कामगार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव पी. बी. रामामूर्ती यांनी सांगितले.
कामगार विभागातर्फे काही प्रस्तावित सुधारणा करण्यात आल्या असून महिलांना काम करण्यासाठी रात्री सात ते सकाळी सहाच्या दरम्यान परवानगी देण्यात येणार असल्याचे एका सरकारी अधिका-यांने सांगितले. 

Web Title: In Karnataka, other women will also be seen in night shift while in other areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.