कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 04:02 PM2024-11-15T16:02:05+5:302024-11-15T16:03:17+5:30
भाजप नेते तथा कर्नाटक विधानसभेतील विरोधीपक्षनेते आर अशोक यांनाही एसआयटीने चौकशीसाठी बोलावले होते. कारण नायडू यांनी आपल्याला हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा आणि एचआयव्ही संक्रमित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला होता.
कर्नाटकात एका पोलीस निरीक्षकाला अटक झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हे संपूर्ण प्रकरण राजकीय विरोधकांना हनीट्रॅपमध्ये अडकवण्याच्या कटाशी संबंधित आहे. अटक करण्यात आलेल्या पोलिस निरीक्षकावर भाजप आमदार मुनीरत्न नायडू यांच्यासोबत हा कट रचल्याचा आरोप आहे.
द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, "भाजप आमदार मुनिरत्न नायडू यांच्यावर एका महिलेचा छळ केल्याचा आणि राजकीय विरोधकांना हनीट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी तिचा वापर केल्याचा आरोप आहे. कर्नाटक पोलिसांची एसआईटी यासंदर्भात दोन प्रकरणांची चौकशी करत आहे. दरम्यान एसआयटीने, 'हेब्बागोडी स्टेशनमध्ये तैनात असलेले पोलीस निरीक्षक अय्याना रेड्डी यांनी राजराजेश्वरी नगरचे आमदार नायडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांची हनीट्रॅपसाठी मदत केली होती,' असा आरोप केला आहे.
अय्याना रेड्डी आणि मुनिरत्ना नायडू यांचे चांगले संबंध असल्याचे बोलले जाते. एसआईटीने त्यांना ताब्यात घेतले आहे. यानंत त्यांची मेडिकल टेस्ट करण्यात आली. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, भाजप आमदार मुनिरत्ना नायडू यांना या प्रकरणात नुकताच जामीन मंजूर झाल आहे. एका 40 वर्षीय सामाजिक कार्यकर्तीने, भाजप आमदाराने आपल्यावर सातत्याने बलात्कार केल्याचा आणि आपला वापर हनीट्रॅपसाठी केल्याचा आरोप केला होता.
विरोधी पक्ष नेत्याचा भाजप आमदाराव गंभीर आरोप -
भाजप नेते तथा कर्नाटक विधानसभेतील विरोधीपक्षनेते आर अशोक यांनाही एसआयटीने चौकशीसाठी बोलावले होते. कारण नायडू यांनी आपल्याला हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा आणि एचआयव्ही संक्रमित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला होता.