सत्तेसाठी कर्नाटक!, जेडीएसला काँग्रेसचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 06:50 AM2018-05-16T06:50:27+5:302018-05-16T06:50:27+5:30

कर्नाटक विधानसभा निवडणुकांत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या, तरी स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे पराभूत झालेल्या काँग्रेसने आता जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे नेते कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा जाहीर केल्याने सत्तेसाठी तिथे खरोखरच ‘सत्तेचे कर-नाटक’ पाहायला मिळणार आहे.

Karnataka to power, hands Congress to JDS | सत्तेसाठी कर्नाटक!, जेडीएसला काँग्रेसचा हात

सत्तेसाठी कर्नाटक!, जेडीएसला काँग्रेसचा हात

googlenewsNext

बंगळुरू/नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकांत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या, तरी स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे पराभूत झालेल्या काँग्रेसने आता जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे नेते कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा जाहीर केल्याने सत्तेसाठी तिथे खरोखरच ‘सत्तेचे कर-नाटक’ पाहायला मिळणार आहे.
भाजपाचे नेते येडियुरप्पा, तसेच जनता दलाचे नेते कुमारस्वामी यांनी मंगळवारी राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेऊ न सत्तास्थापनेचा दावा केला. भाजपाचे १0४ जण निवडून आले आहेत. काँग्रेसचे ७८ व जनता दलाचे ३७ व बसपाचा एक निवडून आले असून, त्यांची बेरीज ११६ होते. सत्तेसाठी सध्या ११२ आमदारांची गरज आहे. भाजपाकडे ७ आमदार कमी असून, ते मिळविण्यासाठी जनता दल व काँग्रेस यांचे आमदार फोडण्याचे प्रयत्न होऊ शकतील. त्यामुळे काँग्रेसने आपल्या आमदारांना सुरक्षित ठिकाणी पाठविण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. कदाचित, जनता दलही त्याचे अनुकरण करू शकेल.
बहुमत मिळाले नसले, तरी सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपाल भाजपालाच सरकार स्थापनेसाठी बोलाविण्याची चिन्हे आहेत.
>...मग फोडाफोडी अशक्य
भाजपाने सरकार बनवायला ८ दिवसांचा वेळ मागितल्याचे समजते. राज्यपाल काँग्रेस-जनता दल यांच्याआधी भाजपाला प्राधान्य देतील व विधानसभेत १५ दिवसांत विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेण्यास सांगतील, असा अंदाज आहे. सरकार स्थापन केल्यास इतर आमदार फोडणे सोपे होईल, असे भाजपाचे गणित आहे, पण काँग्रेस व जनता दलाने पक्षादेश काढल्यास विधानसभेत आमदारांना भाजपाला पाठिंबा देणे शक्य होणार नाही. त्यामुळे सरकार स्थापनेच्या आधीच आमदार फोडण्याचा खेळ सुरू होण्याची चिन्हे आहेत.भाजपाने प्रकाश जावडेकर, जे. पी. नड्डा व धर्मेंद्र प्रधान यांना ताबडतोबीने कर्नाटकात पाठविले आहे.
>होईल आर्थिक देवाणघेवाण
काँग्रेसने कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा दिला असला, तरी काँग्रेसच्या काही आमदारांचा त्या नावाला विरोध आहे. त्याचा फायदा घेण्याचा भाजपा प्रयत्न करेल. त्यामुळे भाजपाचे सरकार स्थापन झाल्यानंतरही विश्वासदर्शक ठराव मंजूर होईपर्यंत काँग्रेस व जनता दलाला आपले आमदार फुटणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागणार आहे. आमदार फोडण्यासाठी निश्चितपणे आर्थिक देवाणघेवाण होईल. भाजपा हे करणार का व कसे करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
>येडियुरप्पा : बी.एस. येडियुरप्पा यांनी शिकारीपुरा मतदारसंघात काँग्रेसच्या गोनी मालतेसा यांचा मोठा पराभव केला.
>सिद्धरामय्या : के. एस. सिद्धरामय्या यांचा बदामी मतदारसंघात विजय झाला. मात्र, चामुंडेश्वरीमध्ये जनता दल (ध) नेत्याने त्यांचा दारुण पराभव केला
>कुमारस्वामी : एच. डी. कुमारस्वामी दोन्ही मतदार संघांतून विजयी झाले आहेत. त्यांनी रामनगरम व चन्नापटना येथून निवडणूक लढवली होती.
>राज्यपालांपुढे ४ पर्याय
कोणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नाही,
तर राज्यघटनेनुसार सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी कोणते पर्याय तपासावेत, याची शिफारस सरकारी आयोगाने केली होती. कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांच्यापुढे हे चार पर्याय, त्याच क्रमाने, उपलब्ध आहेत:
१. सर्वाधिक जागा मिळविणारा वा निवडणूकपूर्व आघाडी केलेल्या पक्षांना पाचारण करणे.
- येथे काँग्रेस आणि जेडीएसने निवडणूकपूर्व आघाडी न केल्याने हा पर्याय कामी नाही. भाजपाला प्रथम बोलविले जाईल.
२. अपक्षांसह इतरांच्या पाठिंब्याने सरकार स्थापनेचा दावा सर्वाधिकजागा जिकणाऱ्या पक्षाने केल्यास त्यांना निमंत्रण देणे.
- यानुसारही भाजपाला फायदा होईल.
३. निवडणुकीनंतर आघाडी केलेले सर्व पक्ष सरकारमध्ये सहभागी होणार असतील, तर त्यांना संधी देणे.
- भाजपा बहुमतासाठीच्या फोडाफोडीत अपयशी ठरल्यास काँग्रेस-जेडीएसला पाचारण केले जाईल.
४. निवडणुकीनंतर आघाडी केलेल्या पक्षांपैकी काही सरकारमध्ये राहून व काही बाहेरून पाठिंबा देणार असतील, तर त्यांना बोलावणे.
- येथेही काँग्रेस-जीडीएसला संधी मिळेल़
>विकासाच्या अ‍ॅजेंड्याला पाठिंबा देऊन भाजपाला सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून दिल्याबद्दल कर्नाटकमधील बंधू-भगिनींचे आभार. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट घेऊन मिळविलेल्या या यशाला सलाम. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
>कर्नाटकमधील भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आणि बी. एस. येदियुरप्पा यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांबद्दल त्यांचे अभिनंदन.
- अमित शहा, अध्यक्ष, भाजपा
>काँग्रेसला मतदान करणाºया कर्नाटकच्या जनतेचे आम्ही आभारी आहोत. त्यांच्यासाठी आम्ही संघर्ष करत राहू.
- राहुल गांधी, अध्यक्ष, काँग्रेस

Web Title: Karnataka to power, hands Congress to JDS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.