कर्नाटकात भीषण अपघात, भाविकांनी भरलेल्या बसची ट्रकला धडक; 13 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 09:40 AM2024-06-28T09:40:03+5:302024-06-28T09:41:07+5:30

बसचालकाला झोप लागल्याने ही दुर्घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

karnataka road accident Fatal accident in Karnataka, bus full of devotees collides with truck; 13 people died | कर्नाटकात भीषण अपघात, भाविकांनी भरलेल्या बसची ट्रकला धडक; 13 जणांचा मृत्यू

कर्नाटकात भीषण अपघात, भाविकांनी भरलेल्या बसची ट्रकला धडक; 13 जणांचा मृत्यू

Karnataka Pilgrims Bus Accident कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यात मोठा अपघात झाला आहे. येथील ब्यादगी तालुक्यात शुक्रवारी एक मिनी बस रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

तीर्थयात्रेवरून परतत होते सर्व भावीक -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित भावीक शिवमोगाचे रहिवासी होते. ते देवी यल्लम्माचे दर्शन घेऊन बेळगावी जिल्ह्यातील सावदट्टी येथून परतत होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

बसचालकाला डुलकी लागल्याने अपघात झाल्याचा संशय -
बसचालकाला झोप लागल्याने ही दुर्घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच, पुढील तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.

Web Title: karnataka road accident Fatal accident in Karnataka, bus full of devotees collides with truck; 13 people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.