मुस्लीम विद्यार्थीनींच्या बुरख्याला विरोध, भगवा गमछा घालून विद्यार्थी शाळेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 06:05 PM2022-01-05T18:05:35+5:302022-01-05T18:06:44+5:30
शाळेचे मुख्याध्यापक अनंत मूर्ती यांनी म्हटलं की, पालक आणि विद्यार्थ्यांसोबत चर्चा झाल्यानंतरच विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबतचा निर्णय घेण्यात येईल. यापूर्वीही शिक्षक आणि विद्यार्थ्यांसमवेत बैठक झाल्यानंतरच याप्रकरणी निर्णय घेण्यात आला होता
बंगळुरू - कर्नाटकच्या कोपा शहरातील एका सरकारी शाळेत विद्यार्थ्यांनी भगवा गमछा घालून बुरखा घालण्याचा निधेष व्यक्त केला. येथील शाळेनेही विद्यार्थ्यांना भगवा कपडा परिधान करून शाळेत येण्यास परवानगी दिली होती. तर, मुस्लीम विद्यार्थींनींना बुरखा घालून न येण्याचे बजावले होते. तरीही, शाळेने आपल्या आदेशात म्हटले की, 10 जानेवारीपर्यंत विद्यार्थी आपल्या इच्छेनुसार पोशाष परिधान करू शकतात. त्यामुळे, येथील विद्यार्थ्यांनी भगवा स्कार्फ परिधान करणे सुरू केलं.
शाळेचे मुख्याध्यापक अनंत मूर्ती यांनी म्हटलं की, पालक आणि विद्यार्थ्यांसोबत चर्चा झाल्यानंतरच विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबतचा निर्णय घेण्यात येईल. यापूर्वीही शिक्षक आणि विद्यार्थ्यांसमवेत बैठक झाल्यानंतरच याप्रकरणी निर्णय घेण्यात आला होता. यापूर्वी 3 वर्षांअगोदर गणवेश घालण्याबाबतचा निर्णय झाला होता. त्या निर्णयाचे आत्तापर्यंत पालन होत होते. मात्र, काही विद्यार्थी अचानक भगवा गमछा परिधान करून येऊ लागले. याबाबत, आता 10 जानेवारीपर्यंत बैठकीनंतर निर्णय घेण्यात येईल.
3 वर्षांपूर्वीही झाला होता वाद
शाळेतील एका विद्यार्थ्याने माहिती देताना सांगितले की, यापूर्वी 3 वर्षांअगोदर बुरखा घालण्यावरुन वाद झाला होता. त्यावेळी, शाळेत कुणीही बुरखा परिधान करून न येण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, गेल्या काही दिवसांत काही विद्यार्थींनी शाळेत येताना बुरखा परिधान करून येऊ लागल्या. त्यामुळे, बुरख्याचा विरोध करण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी भगवा गमछा घालून शाळेत येण्यास सुरुवात केली होती. यापुढेही बुरखा परिधान करुन शाळेत विद्यार्थींनी येत असतील तर आम्ही तीव्र विरोध करू, असेही शाळेतील एका विद्यार्थ्याने म्हटले.