पंतप्रधानांच्या कार्यक्रमांनी कर्नाटक ढवळून निघाले; ‘वंदे भारत’ला हिरवा झेंडा, टर्मिनलचे केले उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 07:05 AM2022-11-12T07:05:03+5:302022-11-12T07:05:24+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भरगच्च कार्यक्रमांनी कर्नाटक ढवळून काढले.

Karnataka stirred by PM programs Green flag to Vande Bharat terminal inaugurated | पंतप्रधानांच्या कार्यक्रमांनी कर्नाटक ढवळून निघाले; ‘वंदे भारत’ला हिरवा झेंडा, टर्मिनलचे केले उद्घाटन

पंतप्रधानांच्या कार्यक्रमांनी कर्नाटक ढवळून निघाले; ‘वंदे भारत’ला हिरवा झेंडा, टर्मिनलचे केले उद्घाटन

googlenewsNext

बंगळुरू :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भरगच्च कार्यक्रमांनी कर्नाटक ढवळून काढले. बंगळुरूचे संस्थापक नंदप्रभू केम्पेगौडा यांच्या १०८ फुटी ब्राँझ पुतळ्याचे अनावरण, येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दुसऱ्या पर्यावरणस्नेही टर्मिनलचे उद्घाटन, दक्षिण भारतातील पहिल्या वंदे भारत रेल्वेला हिरवा कंदील, आदी कार्यक्रमांद्वारे मोदी यांनी विकासकामांचे लोकार्पण केले. 

बंगळुरूचे संस्थापक ‘नादप्रभू’ केम्पेगौडा यांच्या १०८ फूट उंच पुतळ्याचे अनावरण आणि येथून जवळच असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-२ चे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान एका जाहीर सभेला संबोधित केेले.  

पंतप्रधानांनी या कार्यक्रमापूर्वी विधानसौधा परिसरात संतकवी कनक दास आणि महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला. त्यांनी येथील केएसआर रेल्वेस्थानकावर वंदे भारत एक्स्प्रेस आणि भारत गौरव काशी दर्शन रेल्वेला हिरवा झेंडा दाखविला. दरम्यान, हातमाग उत्पादनांवरील जीएसटी मागे घेण्यात यावा अशी मागणी करीत हैदराबादमध्ये ‘मोदी नो एंट्री’ असे बॅनर झळकविण्यात आले.

‘टर्मिनल इन अ गार्डन’
- मोदी यांनी केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-२ चे उद्घाटन केले, जे बांबूचा वापर करून अंदाजे पाच हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले. 
- ‘टर्मिनल इन अ गार्डन’ असे म्हटले जाणाऱ्या या टर्मिनलवरून दरवर्षी २.५ कोटी प्रवाशांची वाहतूक होईल. 
- येथे हिरवेगार वातावरण असेल. 
- प्रवासी १० हजारांहून अधिक चौरस मीटर हरित भिंतीमधून प्रवास करतील. संपूर्ण कॅम्पसमध्ये अक्षय ऊर्जेचा १०० टक्के वापर.

१०८फुटी केम्पेगौडा यांच्या पुतळ्याचे अनावरण
मोदी यांनी शहराचे संस्थापक नादप्रभू केम्पेगौडा यांच्या १०८ फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डनुसार एखाद्या शहराच्या संस्थापकाचा हा सर्वांत उंच पुतळा ठरला आहे. केम्पेगौडा विमानतळावर २१८ टन वजनाचा हा पुतळा बसविण्यात आला आहे. प्रसिद्ध शिल्पकार राम वानजी सुतार यांनी या पुतळ्याची रचना केली आहे. 

Web Title: Karnataka stirred by PM programs Green flag to Vande Bharat terminal inaugurated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.