कर्नाटकात काँग्रेसने २०० युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन दिलं होतं, लोकांनी आतापासून बिल भरण्यास दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 03:32 PM2023-05-19T15:32:06+5:302023-05-19T15:40:12+5:30

काँग्रेसने मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते आणि आम्ही काँग्रेसला मतदान केले आणि काँग्रेस जिंकली, ते मोफत वीज घेण्याचे हक्कदार झाले, असं लोकांच म्हणणं आहे.

karnataka villagers people refused to pay electricity bill congress promised 200 units of free power 2023 | कर्नाटकात काँग्रेसने २०० युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन दिलं होतं, लोकांनी आतापासून बिल भरण्यास दिला नकार

कर्नाटकात काँग्रेसने २०० युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन दिलं होतं, लोकांनी आतापासून बिल भरण्यास दिला नकार

googlenewsNext

कर्नाटकात काँग्रेस विजयी झाली असली तरी सरकार अजुनही स्थापन व्हायचे आहे. त्याचबरोबर काँग्रेसने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, अशी मागणीही लोकांकडून होऊ लागली आहे. आपले सरकार आल्यास लोकांना २०० युनिट वीज मोफत दिली जाईल, असे आश्वासन काँग्रेसने दिले होते. कर्नाटकात सरकार स्थापन व्हायचे असूनही लोकांनी वीजबिल भरण्यास नकार दिला आहे.

पेट्रोल पंपावर झिरो दिसण्यापेक्षा 'ही' गोष्ट महत्त्वाची आहे, त्यावर लक्ष नाही ठेवल्यास होईल तोटा

कर्नाटकातील कोप्पल, कलबुर्गी आणि चित्रदुर्ग जिल्ह्यातील काही गावांतील लोकांनी वीज बिल भरण्यास नकार दिला आहे. कर्नाटक काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात जनतेला २०० युनिट वीज मोफत देण्याचे आश्वासन दिले होते. अशा स्थितीत वीज विभागाचे कर्मचारी वीज बिल घेऊन काही गावात पोहोचले असता, लोकांनी बिले भरण्यास नकार दिला.

लोक म्हणतात की, काँग्रेसने मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते आणि आम्ही काँग्रेसला मतदान केले आणि काँग्रेस जिंकली, ते मोफत वीज देण्याचे हक्कदार झाले. वीजबिल भरणार नसल्यामुळे त्यांच्याकडे वीजबिल घेऊन येऊ नका, असे लोकांनी वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले आहे. आता काहीही झाले तरी आम्ही बिल भरणार नाही, असे लोकांचे म्हणणे आहे.

पाच हमीभाव योजना काँग्रेसच्या जाहीरनाम्यात जाहीर करण्यात आली होती. त्याचा फायदा काँग्रेसला झाल्याचे निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे. मात्र, आता या पाच हमी योजना राबविण्यासाठी काँग्रेस सरकारला मोठा संघर्ष करावा लागणार आहे. खरे तर कर्नाटकातील वीज पुरवठा करणार्‍या कंपन्या आधीच वीज दर वाढवण्याची मागणी करत आहेत. वीज कंपन्यांच्या महसुलात चार हजार कोटींहून अधिकची तफावत आहे. कर्नाटकप्रमाणेच मध्य प्रदेशातही काँग्रेसने मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे.

Web Title: karnataka villagers people refused to pay electricity bill congress promised 200 units of free power 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.