बसच्या बाहेर डोकावून पहात असताना विरुद्ध दिशेने आला ट्रक; महिलेचे शीर धडापासून झालं वेगळं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 19:42 IST2025-01-31T19:41:07+5:302025-01-31T19:42:28+5:30

कर्नाटकात एका भीषण अपघातात बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेचे शीर धडापासून वेगळं झालं होतं.

Karnataka woman was looking out of the bus window her head got separated from the body after being hit by a truck | बसच्या बाहेर डोकावून पहात असताना विरुद्ध दिशेने आला ट्रक; महिलेचे शीर धडापासून झालं वेगळं

बसच्या बाहेर डोकावून पहात असताना विरुद्ध दिशेने आला ट्रक; महिलेचे शीर धडापासून झालं वेगळं

Karnataka Accident: कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेचा विचित्र अपघातात मृत्यू झाला.  सरकारी बसच्या खिडकीतून बाहेर डोकावणाऱ्या एका महिलेचा भरधाव ट्रकने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की महिलेचे शीर हे धडावेगळं झालं. या प्रकरणत ट्रकचालक फरार असून पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. 

कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेला विचित्र रस्ता अपघातात आपला जीव गमवावा लागला. चामराजनगर जिल्ह्यात एका महिलेने बसच्या खिडकीतून डोके बाहेर काढल्यानंतर ही अपघाताची घटना घडली. एका भरधाव ट्रकने तिला धडक दिल्याने तिचे डोके शरीरापासून वेगळे झाले. महिला गुंडलुपेटा ते नंजनगुडला नॉन एसी केएसआरटीसी बसमधून जात असताना हा अपघात झाला. स्थानिक पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अपघातग्रस्त ट्रकचा चालक घटनेनंतर फरार झाला.

विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका भरधाव ट्रकने खिडकीतून वाकून बघणाऱ्या महिलेला धडक दिली आणि तिचे डोके शरीरापासून वेगळे झाले. स्थानिक पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

दरम्यान, गेल्याच आठवड्यात कर्नाटकातील उत्तरा कन्नड जिल्ह्यात स्थानिक जत्रेत फळांची वाहतूक करणारा ट्रक उलटल्याने ११ जणांचा मृत्यू झाला होता. कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ वर २२ जानेवारी रोजी पहाटे फळे आणि विक्रेत्यांना घेऊन जाणारा ट्रक उलटला होता. ज्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आणि १२ जण जखमी झाले. हा ट्रक सावनूरहून येल्लापुरा येथे आयोजित फळ विक्रेत्यांना घेऊन जात होता.
 

Web Title: Karnataka woman was looking out of the bus window her head got separated from the body after being hit by a truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.