एका रात्रीत मिठाईवाला बनला करोडपती
By admin | Published: February 22, 2017 04:16 PM2017-02-22T16:16:37+5:302017-02-22T16:26:25+5:30
फतेहाबाद जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील मिठाईवाला चक्क करोडपती बनला आहे.
ऑनलाइन लोकमत
हिसार, दि. 22 - फतेहाबाद जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील मिठाईवाला चक्क करोडपती बनला आहे. पंजाब स्टेट बंपर ड्रामध्ये त्याला दीड कोटींची लॉटरी लागली आहे. अचानक आझाद सिंह करोडपती झाल्यानं गावानंही जल्लोष व्यक्त केला आहे. त्यामुळे गावक-यांनी जुलूस काढला आणि महिलांनीही गाण्यावर ठेका धरला.
आझाद सिंह हे करोडपती बनल्यानंतर त्यांच्या घराबाहेर गावक-यांनी गर्दी झाली होती. आझाद सिंह म्हणाले, मला लॉटरी खेळण्यात कोणतीही आवड नव्हती, मात्र दोन महिन्यांपूर्वी कामाच्या निमित्तानं सिरसा येथे गेलो असता रस्त्यावरही लॉटरीचे दुकान पाहिलं. त्यानंतर मला लॉटरी काढण्याची हुक्की आली आणि पंजाब स्टेट बंपर लॉटरीचं 200 रुपयांचं तिकीट विकत घेतलं. त्यानंतर सोमवारी दीपक लॉटरी एजन्सीमधून त्यांना फोन आला आणि त्यांना दीड कोटींची लॉटरी लागल्याचं कळवण्यात आलं.
आझाद सिंह यांनी लॉटरी लागल्यानंतर पहिल्यांदा देवाचे आभार मानले. तसेच या रकमेचं काय करणार असल्याचं त्याला प्रश्न विचारण्यात आला असता, त्यानं काही रक्कम धार्मिक आणि सामाजिक कार्यांसाठी दान करणार असल्याचंही सांगितलं आहे. तसेच उर्वरित पैशानं स्वतःच्या घरची परिस्थिती सुधारणार आहे.