कार्ती चिदंबरम यांची इंद्राणीसमोर चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 06:26 AM2018-03-05T06:26:43+5:302018-03-05T06:26:43+5:30
माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम याची सीबीआयच्या पथकाने रविवारी भायखळा महिला कारागृहात इंद्राणी मुखर्जी हिच्यासमोर तब्बल चार तास चौकशी केली.
मुंबई - माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम याची सीबीआयच्या पथकाने रविवारी भायखळा महिला कारागृहात इंद्राणी मुखर्जी हिच्यासमोर तब्बल चार तास चौकशी केली. आयएनएक्स मीडियाला परदेशी निधी मिळवून देण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप कार्तीवर आहे.
शीना बोरा हत्येप्रकरणी इंद्राणी मुुखर्जी गेल्या अडीच वर्षांपासून कारागृहात आहे. या प्रकरणाचा तपासही सीबीआय करीत आहे. २००७ मध्ये आयएनएक्स मीडियाला ३०० कोटींची परकीय गुंतवणूक आणण्यासाठी कार्ती चिदंबरमने लाच मागितली होती. वडील अर्थमंत्री असल्याने तुमच्या कंपनीला फायदा करून चिदंबरमने लाच मागितली होती. वडील अर्थमंत्री असल्याने तुमच्या कंपनीला फायदा करून देऊ, असे कार्तीने आपल्याला सांगितले होते, असा जबाब तिने १७ फेबु्रवारीला महानगर दंडाधिकाºयांसमोर दिला आहे. त्यानंतर कार्तीविरुद्ध फास आवळून सीबीआयने चार दिवसांपूर्वी त्याला अटक केली.
या प्रकरणी सखोल तपास करण्यासाठी सीबीआयचे दिल्लीचे पथक कार्तीला घेऊन विमानाने सकाळी मुुंबईत दाखल झाले. सव्वाअकराच्या सुमारास भायखळा महिला कारागृहात नेण्यात आले. या ठिकाणी एका खोलीत कार्तीला इंद्राणीसमोर बसविण्यात आले. इंद्राणीने दिलेल्या माहितीवरून कार्तीकडे विचारणा करण्यात आली. आयएनएक्स प्रकरणी त्यांच्यामध्ये झालेली चर्चा, व्यवहाराच्या अनुषंगाने सुुमारे चार तास प्रश्नोत्तरे झाली. त्यांच्या संभाषणाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग घेण्यात आले. त्यानंतर साडेतीनच्या सुमारास कार्तीला घेऊन पथक जेलमधून बाहेर पडले. या वेळी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी सीबीआय अधिकाºयांकडे चौकशीबाबत विचारणा केली असता त्यांनी काहीही सांगण्यास नकार देत ते विमानतळाच्या दिशेने निघून गेले. सायंकाळच्या विमानाने पथक दिल्लीकडे रवाना झाले.
प्रसारमाध्यमांना सामोरा
कार्र्ती चिदंबरम याला चौकशीसाठी मुंबईतील भायखळा जेलमध्ये आणण्यात आल्याचे समजल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी या परिसरात मोठी गर्दी केली.
कार्ती चिदंबरमने चौकशीनंतर कारागृहाबाहेर पडताना गाडीच्या फुटबोर्डवर उभे राहत स्मितहास्य करीत प्रसारमाध्यमांच्या दिशेने हात हलविला.