कार्तीने मागितले ७० कोटी, सीबीआयची विशेष न्यायालयात माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 12:40 AM2018-03-03T00:40:56+5:302018-03-03T01:41:45+5:30

आयएनएक्स मीडियाला परदेशी निधी मिळण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी कार्ती चिदंबरमने ७० कोटी रुपये मागितले होते, असा दावा शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जीने आपल्या जबाबात केला आहे.

Karti sought Rs 70 crores, in special CBI court | कार्तीने मागितले ७० कोटी, सीबीआयची विशेष न्यायालयात माहिती

कार्तीने मागितले ७० कोटी, सीबीआयची विशेष न्यायालयात माहिती

Next

नवी दिल्ली : आयएनएक्स मीडियाला परदेशी निधी मिळण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी कार्ती चिदंबरमने ७० कोटी रुपये मागितले होते, असा दावा शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जीने आपल्या जबाबात केला आहे.
कार्तीची कोठडी मिळविण्यासाठी सीबीआयने विशेष न्यायालयात त्याला हजर केले़ सीबीआयकडून युक्तिवाद करताना, अ‍ॅडिशनल सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी इंद्राणीच्या कबुली जबाबाचा तपशील न्यायालयात दिला़ १७ फेब्रुवारीला महानगर दंडाधिकारी न्यायालयासमोर इंद्राणीचा जबाब नोंदविण्यात आला़ त्यात तिने ही माहिती दिली़ मी व पीटर मुखर्जी कार्तीला एका हॉटेलमध्ये भेटलो होतो़ आयएनएक्सला परदेशी निधी मंजूर करून देण्यासाठी कार्तीने ७० लाख रुपयांची मागणी केली होती, असे इंद्राणीने जबाबात म्हटले आहे, असे अ‍ॅड़ मेहता यांनी न्यायालयाला सांगितले़
कार्तीचे वकील व काँग्रसेचे नेते अभिषेक सिंघवी यांनी यावर आक्षेप घेतला़ इंद्राणीवर तिच्या मुलीच्या हत्येचा आरोप आहे़ १० वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची माहिती तिने आता दिली आहे़ इंद्राणीचा जबाब न्यायालयासमोर सादर करण्यामागचा सीबीआयचा हेतू संशय येण्यासारखा आहे़ सीबीआयनेच माध्यमांना जबाबाची माहिती दिली, असा आरोप ज्येष्ठ वकील सिंघवी यांनी केला़
इंद्राणी व पीटरच्या प्रवासाचा, तसेच त्यांनी वास्तव्य केलेल्या हॉटेलचा तपशील आहे, असे अ‍ॅड़ मेहता यांनी स्पष्ट केले़ उभयतांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्यायालयाने कार्तीच्या कोठडीत ५ दिवसांची वाढ केली़
>सीबीआय म्हणजे गाणारे पोपट : सिब्बल
सीबीआयकडून कार्ती चिदंबरम यांना झालेली अटक म्हणजे भारतीय तपास संस्था आता केवळ सरकारी पिंजºयातील बंद पोपट नाहीत तर, गाणारे पोपट आहेत हे सिद्ध होत आहे, अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी गुरुवारी सीबीआयला लक्ष्य केले.

Web Title: Karti sought Rs 70 crores, in special CBI court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.