Karunanidhi Death Update : 'देशाने मास लिडर गमावला', राष्ट्रपती कोविंद, मोदी, पवारांसह रजनीकांतकडून श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 07:31 PM2018-08-07T19:31:51+5:302018-08-08T06:18:36+5:30
Karunanidhi Death : तामिळनाडूतील डीएमके पक्षाचे प्रमुख एम. करुणानिधी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 94 व्या वर्षी चेन्नईतील कावेरी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करुणानिधी यांच्या मृत्यूनंतर राजकीय वर्तुळातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
नवी दिल्ली - तामिळनाडूतील डीएमके पक्षाचे प्रमुख एम. करुणानिधी यांचे निधन झाले. वयाच्या 94व्या वर्षी चेन्नईतील कावेरी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करुणानिधी यांच्या मृत्यूनंतर राजकीय वर्तुळातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, रजनीकांत यांनी करुणानिधी यांच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
करुणानिधी यांच्या निधनाच्या वृत्ताने मला अतिशय दु:ख झाले आहे. करुणानिधी एक सदृश वारसा सोडून जात आहेत. सार्वजनिक जीवनात अशी संपत्ती कमी मिळते. करुणानिधी यांचे कुटुंब आणि चाहत्यांच्या दु:खात आपण सहभागी आहोत, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले आहेत.
श्री एम करुणानिधि के निधन के बारे में सुनकर दुख हुआ। "कलैनार" के नाम से लोकप्रिय वह एक सुदृढ़ विरासत छोड़ कर जा रहे हैं जिसकी बराबरी सार्वजनिक जीवन में कम मिलती है। उनके परिवार के प्रति और लाखों चाहने वालों के प्रति मैं अपनी शोक संवेदना व्यक्त करता हूँ – राष्ट्रपति कोविन्द
— President of India (@rashtrapatibhvn) August 7, 2018
करुणानिधी हे भारताचे ज्येष्ठ नेते होते, त्यामुळे आपण एका मोठ्या नेत्याला, विचारवंताला, लेखकाला आणि समाजासाठी आपले जीवन वाहून घेतलेल्या बाहुबली नेत्याला गमावल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली. करुणानिधींच्या मृत्युमुळे मला अतिशय दु:ख झाल्याचे म्हणत मोदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
Deeply saddened by passing away of Kalaignar Karunanidhi. He was one of the senior most leaders of India. We have lost a deep-rooted mass leader, prolific thinker, accomplished writer and a stalwart whose life was devoted to the welfare of the poor and the marginalised: PM Modi pic.twitter.com/4fw9KLhT16
— ANI (@ANI) August 7, 2018
करुणानिधी वरिष्ठ नेते होते. तमिळनाडूच्या राजकारणाला त्यांनी वेगळ वळण दिल. लोकप्रिय असे नेतृत्व होतं. अनेक प्रकारच्या गोष्टी केल्या. सामाजिक सुधार हा त्यांचा नेहमीच एजेंडा राहिला. ते एक सिद्धहस्त लेखक आणि वक्ते होते. भारताच्या राजकारणात केंद्रातील सत्तेला ज्यांची नेहमीच दखल घ्यावी लागायची असे ते नेते होते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनीही करुणानिधींच्या मृत्युबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच एका मोठ्या तत्ववेत्त्याला आणि लेखकाला देश मुकल्याचे शिंदे यांनी म्हटले. माझ्या आयुष्यातील आज सर्वात काळा दिवस असून मी आज काय गमावलयं हे मी कधीही विसरू शकत नसल्याची भावनात्मक प्रतिक्रिया दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी दिली. तसेच मी त्यांच्या आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असेही ते म्हणाले.
Today is a black day in my life, one which I can never forget as I lost my #Kalaignar. I pray for his soul: Rajinikanth on #Karunanidhi (file pic) pic.twitter.com/R8ociRQSsN
— ANI (@ANI) August 7, 2018
भारतीय राजकाणातील मास लिडर असलेल्या करुणानिधींच्या निधनामुळे दु:ख झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे. मी त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी असल्याचेही पवार यांनी म्हटले.
Saddened to know about the demise of DMK President and former CM of Tamilnadu M. Karunanidhi. He will be always remembered as a leader of masses in the Indian political realm. My heartfelt condolences with his family. May his soul rest in peace.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 7, 2018
लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडून श्रद्धांजली
Pained to learn about the sad demise of Dr. M. Karunanidhi. His passing away is an irreparable loss to country and to the state of Tamil Nadu and marks end of an era. I convey my heartfelt condolences to members of his bereaved family and his supporters across the country.
— Sumitra Mahajan (@S_MahajanLS) August 7, 2018
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडून शोक व्यक्त
Loved by the Tamilian people, Kalaignar strode the stage of Tamil politics, like a colossus, for over 6 decades. In his passing, India has lost a great son. My condolences to his family as also to the millions of Indians who grieve for their beloved leader tonight.#Karunanidhi
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 7, 2018
राज ठाकरेंकडून श्रद्धांजली
#RIPKalaignarpic.twitter.com/7aGnVQSX6L
— Raj Thackeray (@RajThackeray) August 7, 2018