एम. करुणानिधींची प्रकृती आणखी खालावली, रुग्णालयाबाहेर समर्थकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 05:25 PM2018-08-07T17:25:42+5:302018-08-07T17:55:01+5:30
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख एम. करुणानिधी यांची प्रकृती आणखी खालावल्याचे सांगण्यात येत आहे.
चेन्नई : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख एम. करुणानिधी यांची प्रकृती आणखी खालावल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून एम. करुणानिधी यांच्यावर कावेरी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयी मंगळवारी रुग्णालयाने मेडिकल बुलेटिन जारी केले. या बुलेटिनमध्ये एम. करुणानिधी यांची प्रकृती आणखी बिघडली असून त्यांच्यावरील उपचारांना हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, एम. करुणानिधी यांची तब्येत खालावल्याचे समजताच त्यांच्या समर्थकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली आहे.
Chennai: DMK workers break down after Kauvery Hospital released statement that M Karunanidhi's health has deteriorated further. pic.twitter.com/LapebJnjvi
— ANI (@ANI) August 7, 2018
#Chennai: DMK workers gather outside Kauvery Hospital as hospital releases statement that M Karunanidhi's health has deteriorated further. pic.twitter.com/rZ8yW7Uco5
— ANI (@ANI) August 7, 2018
एम. करुणानिधी यांना 29 जुलै रोजी तब्येत बिघडल्याने कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत सतत चढउतार होताना दिसत आहे. काल सायंकाळी रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. अरविंदन सेल्वराज यांनी जारी केलेल्या बुलेटिनमध्ये एम. करुणानिधींच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली होती. तसेच, येत्या 24 तासांत औषधोपचारांना त्यांनी दिलेल्या प्रतिसादावरुन पुढील अंदाज बांधता येतील, असे या बुलेटीनमध्ये म्हटले होते. मात्र, 24 तास उलटले तरी एम. करुणानिधी यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, त्यांच्यावर सतत निगराणी राखली जात असून सुसज्ज वैद्यकीय सुविधेत उपचार सुरू आहेत.
There has been a significant decline in the clinical condition of Dr M Karunanidhi over the last few hours: Kauvery Hospital pic.twitter.com/NzULWrQsag
— ANI (@ANI) August 7, 2018