पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना कसाबचे धडे

By admin | Published: July 6, 2014 04:13 PM2014-07-06T16:13:26+5:302014-07-06T16:22:18+5:30

पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला करणा-या कसाबवर धडे दिले जात असल्याची माहिती उघड झाली आहे.

Kasab's lessons to terrorists in Pakistan | पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना कसाबचे धडे

पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना कसाबचे धडे

Next

 

ऑनलाइन टीम
श्रीनगर, दि. ६ - पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला करणा-या कसाबवर धडे दिले जात असल्याची माहिती उघड झाली आहे. यात कसाबने दहशतवादी हल्ल्यांमध्ये केलेल्या चुका दाखवल्या जात असून या चूका कशा टाळता येतील यावर माहिती दिली जात आहे. 
काही दिवसांपूर्वी जम्मू - काश्मीरमध्ये लष्कर ए तोयबाचा कमांडर अबू हनझल्ला उर्फ मोहम्मद नावीद जत याला भारतीय सुरक्षा यंत्रणांनी अटक केली होती.  चौकशी दरम्यान जतने पाकिस्तानमधील दहशतवादी केंद्रांविषयी काही महत्त्वपूर्ण माहिती उघड केली आहे. जतने पाकिस्तानमधील मुलतान येथे दहशतवादी प्रशिक्षण घेतले. पाकमध्ये प्रशिक्षण घेत असताना मुंबईवर दहशतवादी हल्ला करणा-या अजमल कसाबची भेट झाली होती. मुंबई हल्लाच्या वर्षभरापूर्वी कसाबला भेटलो होतो असे जतने भारतीय अधिका-यांना सांगितले. मुंबई हल्ल्यानंतर २००९ पासून पाकच्या दहशतवादी केंद्रांमध्ये कसाबचे धडे सुरु झाले. २००९ मध्ये दौरा ए सुफा मक्सर संघटनेच्या अक्सर कॅम्प येथे कसाबच्या चुकांवर आधारित एक व्हिडीओ प्रशिक्षणार्थी दहशतवाद्यांना दाखवण्यात आला होता. यात कसाबने मुंबई हल्ल्यात केलेल्या चुकांचा समावेश होता. मुंबई गाठण्यासाठी वापरलेली बोट नष्ट करणे, सॅटेलाईट फोनवरुन ख-या नावाने संभाषण करणे, नागरिकांना बंधक न बनवण्यात आलेले अपयश आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकणे या चूकांचा व्हिडीओत समावेश होता असा धक्कादायक खुलासा जतने केला आहे. 
दहशतवादी धडे घेतल्यावर जत २०१२ मध्ये जम्मूतील केरन येथून भारतात आला होता. जम्मूतील पोलिस अधिका-यांची हत्या, सुरक्षा दलाच्या कॅम्पवर हल्ला या प्रकरणांमध्ये जतचा समावेश होता. जतने दिलेल्या या माहितीवरुन पाकिस्तानमधील दहशतवादी केंद्रांविषयीची महत्त्वपूर्ण भारताच्या हाती आली आहे. 

Web Title: Kasab's lessons to terrorists in Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.