‘कासव’ सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट
By admin | Published: May 4, 2017 03:51 AM2017-05-04T03:51:55+5:302017-05-04T03:51:55+5:30
सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मराठीतील ‘कासव’ला तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा अक्षय कुमार आणि मल्याळम अभिनेत्री सुरभी ज्योती यांना सर्वोत्कृष्ट
नवी दिल्ली : सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मराठीतील ‘कासव’ला तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा अक्षय कुमार आणि मल्याळम अभिनेत्री सुरभी ज्योती यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते बुधवारी येथील विज्ञान भवनमधील दिमाखदार ६४ व्या राष्ट्रीय चित्रपट सोहळ््यात प्रदान करण्यात आले.
ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक के. विश्वनाथ यांना अत्यंत प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विश्वनाथ हे केवळ तेलगू चित्रपटांपुरतेच महत्वाचे नाहीत तर त्यांनी हिंदी आणि तमिळ चित्रपटही दिग्दर्शित केले आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विश्वनाथ यांना हा ४८ वा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. दहा लाख रुपये रोख आणि सुवर्णकमळ, मानपत्र व शाल असा हा पुरस्कार आहे. विश्वनाथ यांच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील कामगिरीचा मुखर्जी यांनी गौरवाने उल्लेख केला. ते म्हणाले त्यांच्या चित्रपटांतून राष्ट्रीय ऐक्य, एकात्मता व शांततेचा संदेश जातो. यावेळी माहिती व प्रसारण मंत्री एम. व्यंकय्या नायडू व राज्यमंत्री राजवर्धन राठोड उपस्थित होते.
अक्षय कुमार यांना ‘रुस्तूम’ चित्रपटातील भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार तर मल्याळी अभिनेत्री सुरभी लक्ष्मी हिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार ‘मिन्नामिनुनगू’ या चित्रपटातील भूमिकेसाठी मिळाला. सोनम कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘नीरजा’ने सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मिळवला. ‘दंगल’ मधील जायरा वासीम हिला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. सामाजिक संदेश देणाऱ्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘पिंक’ला मिळाला. उत्कृष्ट बाल कलाकाराचा पुरस्कार आदिश परवीर याला मल्याळम चित्रपट ‘कुंजू दैवम’ मधील भूमिकेसाठी प्रदान करण्यात आला.
प्रादेशिक पुरस्कार विजेते
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट : नीरजा
सर्वोत्कृष्ट बांगला चित्रपट : विसर्जन
सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट : रिझर्व्हेशन
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट : दशक्रिया
सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट : राँग साईड राजू
सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट : जोकर
सर्वोत्कृष्ट तेलगू चित्रपट : पेल्ली चिपुलू
सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट : महेशिंते प्रथिकारम
सुवर्ण कमळ विजेते
सर्वोत्कृष्ट चित्रपट कासव (मराठी)
दिग्दर्शकाचा पहिला सर्वोेत्कृष्ट चित्रपट : खलिफा (बंगाली)
सर्वोत्कृष्ट मनोरंजन चित्रपट : सथामनम भावती (तेलगू)
सर्वोत्कृष्ट मुलांचा चित्रपट : धनक (हिंदी)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन : व्हेंटिलेटरसाठी राजेश म्हापुसकर
रजत कमळ
सर्वोत्कृष्ट अभिनेता : अक्षय कुमार ( रुस्तूम)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : सुरभी लक्ष्मी (मिन्नामिनुनगे)
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता : मनोज जोशी (दशक्रिया)
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री : झायरा वासीम (दंगल)
सर्वोत्कृष्ट बाल कलाकार : मनोहर (रेल्वे चिल्ड्रेन)
सर्वोेत्कृष्ट पुरूष पार्श्वगायन : सुंदरा अय्यर (जोकर),
सर्वोेत्कृष्ट स्त्री गायक : एम्मान चक्रवर्ती (प्राक्तन)
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण : तिरू,
सर्वोत्कृष्ट पटकथा : (मूळ) शाम पुष्करन (महेशिंते प्रथीकारण)
सर्वोत्कृष्ट पटकथा (आधारीत) : संजय कृष्णाजी पटेल (दशक्रिया)
इतर सामाजिक प्रश्नांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट : पिंक
पर्यावरणावर/संवर्धन : द टायगर व्हू क्रॉसड् द लाईन
सर्वोत्कृष्ट संपादन : रामेश्वर एस. भगत (व्हेटिंलेटर)