धक्कादायक! ...अन् घरातून वरात निघण्याऐवजी निघाली अंत्ययात्रा; मन हेलावून टाकणारी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 11:45 AM2020-05-16T11:45:38+5:302020-05-16T11:52:37+5:30
घरातून बहिणीची वरात निघण्याऐवजी भावाची अंत्ययात्रा निघाल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे.
कासगंज - देशावर कोरोनाचं संकट आलेलं असतानाच अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. घरातून बहिणीची वरात निघण्याऐवजी भावाची अंत्ययात्रा निघाल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातल्या कासगंजमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. घरात आनंदाचं वातावरण असून बहिणीच्या लग्नाची तयारी सुरू असताना एका भावाने स्वत: वर गोळी झाडून घेतली आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली.
कासगंजमधील सिकंदरपूर गावात मे महिन्यात श्रीपाल यांच्या दोन मुलींची लग्न होणार होती. मात्र कोरोनामुळे त्यांनी घरच्या घरीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. कमी नातेवाईकांच्या उपस्थित विवाह सोहळा संपन्न झाला. सूरजमुखी आणि रश्मी या दोन बहिणींची लग्न एकाच मांडवात लागणार होती. 8 मेला दोन्ही वरात दारात येणार होत्या. पण लॉकडाऊनच्या नियमांमुळे सूरजमुखीच्या सासरची मंडळी तिला 9 तारखेलाच घेऊन गेली. तर रश्मीची पाठवणी 12 तारखेला करण्याचं ठरलं होतं.
'अणुबॉम्ब टाकायला जातोय...'; नौदलाच्या पायलटने हटके अंदाजात मागितली लग्नासाठी सुट्टी, पत्र व्हायरलhttps://t.co/75ndJdtw3M
— Lokmat (@MiLOKMAT) May 16, 2020
घरामध्ये मुलीच्या पाठवणीची जोरदार तयारी सुरू असताना अचानक घराच्या छतावरून गोळी झाडल्याचा आवाज झाला. रश्मीचा मोठा भाऊ संतोष याने स्वतःवर गोळी झाडून घेतली होती. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. संतोषने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. संतोषचं 6 वर्षांपूर्वी लग्न झालेलं असून त्याला 3 वर्षाचा मुलगाही आहे. घरातून वरात निघण्याऐवजी अंत्ययात्रा निघाल्याची घटना घडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : बापरे! स्मार्टफोनमुळे पसरू शकतो कोरोना; डॉक्टरांनी दिला थेट 'हा' इशाराhttps://t.co/lJnCiA31Ow#CoronaUpdatesInIndia#mobile#technology
— Lokmat (@MiLOKMAT) May 16, 2020
कोरोनाच्या संकटात देशाला 'अम्फान' चक्रीवादळाचा धोका! 'या' राज्यांत मुसळधार पावसाची शक्यताhttps://t.co/qGtXSiL3n8#Amphan#CycloneAmphan#rain
— Lokmat (@MiLOKMAT) May 16, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 46 लाखांवर; 3 लाख लोकांचा मृत्यू
CoronaVirus News : बापरे! स्मार्टफोनमुळे पसरू शकतो कोरोना; डॉक्टरांनी दिला थेट 'हा' इशारा
'अणुबॉम्ब टाकायला जातोय...'; नौदलाच्या पायलटने हटके अंदाजात मागितली लग्नासाठी सुट्टी, पत्र व्हायरल
कोरोनाच्या संकटात देशाला 'अम्फान' चक्रीवादळाचा धोका! 'या' राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता
CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये 200 चिमुकल्यांचा वाचवला जीव, रक्ताचं नातं जोडणारा अवलिया
CoronaVirus News : सरकारने मागवले 'हे' खास मशीन, आता 24 तासांत होणार 1200 सँपल टेस्ट
CoronaVirus News : ... म्हणून कोरोनाला रोखण्यात 'हे' 18 देश ठरले यशस्वी