कासगंज दंगल; हिंसाचारात मारल्या गेलेल्या तरुणाच्या वडिलांना धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 01:33 AM2018-02-03T01:33:57+5:302018-02-03T01:34:10+5:30

गेल्या आठवड्यात हिंसाचारात मारला गेलेला चंदन गुप्ता (२२) याच्या कुटुंबाला धमक्या मिळत असून त्यानंतर या कुटुंबाला सुरक्षा पुरविण्यात आली आहे. घराबाहेर बसलो असताना दुचाकीवर आलेल्या काही लोकांनी आपल्याला धमकी दिली, अशी तक्रार चंदनचे वडील सुशील गुप्ता यांनी केली आहे.

Kasganj riots; The threat of the youth who was killed in the violence was threatened | कासगंज दंगल; हिंसाचारात मारल्या गेलेल्या तरुणाच्या वडिलांना धमकी

कासगंज दंगल; हिंसाचारात मारल्या गेलेल्या तरुणाच्या वडिलांना धमकी

Next

कासगंज (उत्तरप्रदेश)  - गेल्या आठवड्यात हिंसाचारात मारला गेलेला चंदन गुप्ता (२२) याच्या कुटुंबाला धमक्या मिळत असून त्यानंतर या कुटुंबाला सुरक्षा पुरविण्यात आली आहे. घराबाहेर बसलो असताना दुचाकीवर आलेल्या काही लोकांनी आपल्याला धमकी दिली, अशी तक्रार चंदनचे वडील सुशील गुप्ता यांनी केली आहे.
सुशील गुप्ता म्हणाले की, आमचे जगणे असुरक्षित झाले आहे. सुरक्षेसाठी बंदुकीचा परवाना देण्यात यावा. चंदनच्या वडिलांना आलेल्या धमकीनंतर या कुटुंबाला सुरक्षा पुरविण्यात आली आहे, असे पोलीस अधिकाºयाने सांगितले. प्रजासत्ताक दिनानिमित्त काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेच्या दरम्यान हा हिंसाचार झाला होता. यात सहभागी दुचाकीवरील लोक घोषणा देत होते. ही यात्रा अल्पसंख्यांक समुदाय असलेल्या भागात पोहचल्यानंतर तिथे दगडफेक व गोळीबार झाला. या गोळीबारात चंदनचा मृत्यू झाला. तर, दोन जण जखमी झाले. यात्रेतील काहींनीही दोनदा गोळीबार केला आणि काहींच्या हातात लाठ्या व दंडेुके होते. त्या वस्तीत अल्पसंख्यांकांच्या विरोधात घोषणा दिल्याचे सांगण्यात येते. त्याच्या प्रत्युत्तरात सलीम याने गोळीबार केला, असे काहींचे म्हणणे आहे.
चंदनच्या कुटुंबाला राज्य सरकारतर्फे २० लाख रुपयांचा चेक देण्यात आला आहे. तथापि, चंदनला शहिदाचा दर्जा देण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. प्रकरणातील मुख्य आरोपी सलीम यास पोलिसांनी अटक केली आहे. पण, हत्येचा आरोप असणारे सलीमचे दोन भाऊ फरार झाले आहेत. नसीम आणि वसीम या दोघांना पकडण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. सलीम यानेच घराच्या छपरावरुन गोळीबार केला होता, असे उपस्थितांचे म्हणणे आहे.

राज्यावरील कलंक

कासगंजमधील हा हिंसाचार म्हणजे राज्यावरील कलंक असल्याचे राज्यपाल राम नाईक यांनी म्हटले आहे. तर, या प्रकरणावरून विरोधकांनीही सरकारवर टीका केली. राज्यपाल नाईक यांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनातील अधिकाºयांच्या बैठक घेऊ न, त्यांना कारवाईचे अधिकार दिले.

Web Title: Kasganj riots; The threat of the youth who was killed in the violence was threatened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.