काशी-तामिळनाडू शिवमय-शक्तिमय; प्राचीन दुवे शोधणार - पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 07:24 AM2022-11-20T07:24:14+5:302022-11-20T07:24:36+5:30

‘काशीमध्ये बाबा विश्वनाथ असतील तर तामिळनाडूमध्ये भगवान रामेश्वरमचा आशीर्वाद आहे.

Kashi-Tamil Nadu Shivamay-Shaktimay; Will find ancient links says PM modi | काशी-तामिळनाडू शिवमय-शक्तिमय; प्राचीन दुवे शोधणार - पंतप्रधान

काशी-तामिळनाडू शिवमय-शक्तिमय; प्राचीन दुवे शोधणार - पंतप्रधान

Next

वाराणसी : काशी व तामिळना़डू ही संस्कृती, सभ्यता यांची कालातीत केंद्रे आहेत. ही दोन्ही ठिकाणे संस्कृत, तमिळ या जगातील सर्वांत जुन्या भाषांची केंद्रे आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे केले. ‘काशी तमिळ संगम’ या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. देशातील सर्वांत प्राचीन  अध्ययन पीठे असलेल्या काशी आणि तामिळनाडू यांच्यातील प्राचीन दुवे शोधण्यासाठी आयोजित हा कार्यक्रम महिनाभर चालणार आहे. 

‘काशीमध्ये बाबा विश्वनाथ असतील तर तामिळनाडूमध्ये भगवान रामेश्वरमचा आशीर्वाद आहे. काशी आणि तमिळनाडू दोन्ही ‘शिवमय’ व ‘शक्तिमय’ आहेत. तामिळनाडूमध्येही दक्षिण काशी आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. या कार्यक्रमानिमित्त तमिळनाडूतील २५०० हून अधिक प्रतिनिधी वाराणसीला भेट देत आहेत. तमिळ संगम संमेलन हा पंतप्रधानांच्या ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ या उपक्रमाचा एक भाग आहे. 
 

Web Title: Kashi-Tamil Nadu Shivamay-Shaktimay; Will find ancient links says PM modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.