काश्मीर पुन्हा अशांत

By admin | Published: March 29, 2017 03:14 AM2017-03-29T03:14:18+5:302017-03-29T03:14:18+5:30

काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाने अतिरेक्यांविरुद्ध उघडलेल्या मोहिमेत एकमेव अतिरेक्याला मारण्यात यश आले

Kashmir again turbulent | काश्मीर पुन्हा अशांत

काश्मीर पुन्हा अशांत

Next

श्रीनगर : काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाने अतिरेक्यांविरुद्ध उघडलेल्या मोहिमेत एकमेव अतिरेक्याला मारण्यात यश आले. त्यावेळी सुरक्षा दलांवर स्थानिक लोकांनी जोरदार दगडफेक केली. त्यावेळी सुरक्षा दलाच्या कारवाईत तीन नागरिकांचा मृत्यू झाला, १८ जण जखमी झाले.
घटनास्थळाहून काही शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली. एकमेव अतिरेक्याला ठार मारण्यात आले आहे. कारवाईत एक जवान जखमी झाला आहे. मारल्या गेलेल्या तिघांचे वय २0 च्या आसपास आहे. अतिरेक्याला पळून जाण्यासाठी मदत करण्यासाठी तेथे दगडफेक होत होती.
दहशतवाद्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने चदुरा भागात दरबाग परिसराला घेरले. मोहीम सुरू असताना अतिरेक्याने गोळीबार सुरू केला. त्यानंतर ही चकमक सुरू झाली.
मारल्या गेलेल्या तीन जणांमध्ये जाहीद डार, सादिक अहमद आणि इशफाक अहमद वाणी यांचा समावेश आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

इशारा देऊनही हाती दगड
लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी यापूर्वीच येथील आंदोलकांना इशारा दिला होता की, दहशतवादविरोधी आंदोलनात येथील तरुणांनी हस्तक्षेप करू नये. एन्काउंटर स्थळापासून तीन कि.मी.च्या परिसरात कलम १४४ लागू केल्यानंतरही तरुण येथे हस्तक्षेप करीत असल्याचे दिसून येत आहे.

पुन्हा पॅलेट गनचा वापर
काश्मीर खोऱ्यात दंगलखोर जमावांना आवर घालण्यासाठी पॅलेट गनऐवजी पर्यायी उपायांचा वापर करण्यास सुरक्षा दलांना सांगण्यात आले आहे. परंतु हे पर्याय निकामी ठरत असल्याचे दिसल्यास पुन्हा पॅलेट गनचा वापर सुरू करण्याचा विचार केला जाऊ शकेल, असे गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी मंगळवारी लोकसभेत सांगितले.
ते म्हणाले की, काश्मीर खोऱ्यात पॅलेट गनच्या वापराने अनेक नागरिकांचे डोळे जाण्यावरून जनक्षोभ व्यक्त झाल्यानंतर सरकारने समिती नेमली.
या समितीने पॅलेट गनऐवजी मिरचीपूड असलेल्या नळकांड्या व अश्रुधुराच्या नळकांड्या, असे पर्याय सुचविले. सुरक्षा दलांना हे पर्याय वापरण्यास सांगण्यात आले आहे. परंतु ते निष्प्रभ ठरल्यास पुन्हा पॅलेट गनचा वापर केला जाऊ शकेल.
 

 

Web Title: Kashmir again turbulent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.