काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र, 20 गावांना घातला घेराव
By admin | Published: May 4, 2017 04:15 PM2017-05-04T16:15:21+5:302017-05-04T16:15:21+5:30
जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र केली आहे. गेल्या काही दिवसांपासून दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांत वाढ झाल्यामुळे
Next
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 4 - जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र केली आहे. गेल्या काही दिवसांपासून दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांत वाढ झाल्यामुळे सुरक्षा दल मोठी कारवाई करण्याची तयारी करत आहे. दक्षिण काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दहशतवादी असल्याचं वृत्त मिळाल्यानंतर येथील 20 गावांना सुरक्षा दलाने घेराव घातला आहे. लष्कराकडून येथे मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे.
या सर्च ऑपरेशनमध्ये हेलीकॉप्टर आणि ड्रोनचाही वापर केला जात आहे. या ऑपरेशनमध्ये लष्कर, निमलष्करी दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांचे सुमारे 2500 ते 3000 जवान सहभागी आहेत. शोपियांमध्ये दहशतवादी फिरतानाचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी ऑपरेशन सुरू केले आहे.
काही दिवसांपासून येथे बॅंक लुटण्याचे, एटीएमची कॅश व्हॅन आणि पोलिसांची हत्यारं लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. दक्षिण शोपियांमध्ये बुधवारी रात्री उशिरा संशयित अतिरेक्यांनी कोर्ट कॉम्पलेक्सच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांवर हल्ला करत 5 सर्व्हिस रायफल लुटून नेल्या होत्या. दहशतवाद्यांनी 4 इन्सास रायफल आणि 1 एके 47 रायफलही लुटली होती. त्याचबरोबर बुधवारीच पुलवामा येथे 2 तासात 2 बँका लुटण्यात आल्या होत्या.
गतवर्षी हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वानी चकमकीत ठार झाल्यानंतर निर्माण झालेल्या हिंसक आंदोलनानंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात दहशतवादविरोधी ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.