काश्मीरच्या अशांततेला चीन कारणीभूत - मुफ्ती
By admin | Published: July 16, 2017 04:15 AM2017-07-16T04:15:04+5:302017-07-16T04:15:04+5:30
सिक्किमजवळील डोकलाम पठारावरून सुरु असलेल्या वादास नवा रंग देत चीनने जम्मू-काश्मीरचा भाग असलेला लडाखही वादग्रस्त प्रदेश असल्याचे शनिवारी
नवी दिल्ली/ बीजिंग : सिक्किमजवळील डोकलाम पठारावरून सुरु असलेल्या वादास नवा रंग देत चीनने जम्मू-काश्मीरचा भाग असलेला लडाखही वादग्रस्त प्रदेश असल्याचे शनिवारी म्हटले व पाकिस्तानचा उल्लेख ‘पोलादी मित्र’ असा केला आहे. त्यामुळे दोन देशांतील तणाव आणखी वाढणार असे दिसू लागले आहे.
दुसरीकडे काश्मीरमधील अशांततेस पाकिस्तानबरोबरच चीनही कारणीभूत आहे, असा आरोप काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केला आहे.काश्मीरमध्ये चीनही ढवळाढवळ करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनीच म्हणणे याचा अर्थ त्यात तथ्य असू शकते.
मेहबुबा मुफ्ती यांनी आज सकाळी दिल्लीत गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली आणि त्यांना राज्यातील परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी चीनही काश्मीरमध्ये गडबड करीत असल्याचे सांगितले.
दरम्यान चीनच्या शिन्हुआ वृत्तसंस्थेने डोकलाम वादाविषयीच्या भाष्यात म्हटले की, भारताने माघार घेणे हाच वाद मिटविण्याचा एकमेव पर्याय आहे. तसे केले नाही तर भारताची नाचक्की होईल.
सन २०१३ व २०१४ मधील घटनांचा उल्लेख करताना चीन म्हणते की, त्यावेळी चीन, पाकिस्तान व भारत यांच्यात लडाख या वादग्रस्त प्रदेशावरून वाद झाला होता. त्यावेळी राजनैतिक वाटाघाटींतून वाद मिटू शकला होता. परंतु आताची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. (वृत्तसंस्था)